सोलापूर : कोरोना वाढू लागल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामीण भागात तर शहरात महापालिका आयुक्तांनी मिनी लॉकडाऊन म्हणून कडक निर्बंध लागू केले आहेत. त्याअंतर्गत मद्यविक्री पूर्णपणे बंद असून रेस्टॉरंटदेखील बंद आहेत. यात मद्यपींची मोठी पंचाईत होत आहे. त्यांना हा दारुचा विरह सहन होत नाही.
ब्रेकींग न्यूज : राज्यातील 17 साखर कारखान्यांना मालमत्ता जप्तीची नोटीस, सोलापुरातील नऊ कारखान्यांचा समावेश #surajyadigital #जप्ती #साखरकारखाना #मालमत्ता #property #सुराज्यडिजिटल #sugarfactors #notice #नोटीस pic.twitter.com/BKaXAVN1Rj
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 8, 2021
30 एप्रिलपर्यंत हे निर्बंध लागू राहणार असून पुढील परिस्थिती पाहून शिथिलतेचा निर्णय होणार आहे. त्यामुळे सोलापुरातील एका रेस्टॉरंटमध्ये घुसून चोरट्याने पाच हजार 100 रूपयांची दारू पळवून नेल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री ते बुधवारी (ता. 7) सकाळी दहा या वेळेत घडली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
होटगी रोडवर पुष्कर बार ऍण्ड रेस्टॉरंट आहे. मिनी लॉकडाऊनमुळे दोन दिवसांपासून बंदच आहे. चोरट्याने ही संधी साधली आणि मंगळवारच्या मध्यरात्री तो चक्क खिडकीतून रेस्टॉरंटमध्ये घुसला. त्यानंतर त्याने रेस्टॉरंटमधील पाच हजार 100 रुपयांची दारू चोरली. तसेच हॉटेलमधील साडेचार हजार रुपये, पाच हजारांचा संगणक चोरून नेला.
'महाराष्ट्र सरकारने 5 लाख डोस वाया घालवले, असे कसे चालेल?' https://t.co/U9DSpc7oz3
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 8, 2021
यात दीपक रामचंद्र मोरे (रा. विजयनगर, नई जिंदगी रोड) यांनी विजापूर नाका पोलिसांत फिर्याद दिली. चोरट्याने रेस्टॉरंटचा मागील दरवाजा उचकटला. त्यानंतर वॉल कंपाउंडवर चढून खिडकीतून आत प्रवेश केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्या चोरट्याचा शोध पोलिस हवालदार घुगे हे घेत आहेत.