नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय आरोग्य दिवसानिमित्त योगगुरू बाबा रामदेव यांनी कोरोना आणि लसीकरणावर भाष्य केले. आपण कोरोना लसीकरणाच्या विरोधात नाही. पण लसीकरणाच्या सहा महिन्यांनंतर ती रोग प्रतिकारक क्षमता संपू शकते. अशात सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क व्यतिरिक्त आपली इम्युनिटी वाढवणं आवश्यक आहे. तसंच योग केला तर 30 ते 50 टक्के अधिक अँटीबॉडीज वाढतात. यासाठी लसीकरणासोबतच योग करणेही आवश्यक आहे, असं ते म्हणाले.
दुसरा डोस घेताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवर्जून मास्क वापरला, पहिल्या डोसवेळी वापरला नव्हता, यामुळे टीका झाली होती. #surajyadigital #PM #PMOIndia #PMO #सुराज्यडिजिटल #coronavacation pic.twitter.com/Q507NEd5TL
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 8, 2021
जगभरात बुधवारी आंतरराष्ट्रीय आरोग्य दिवस साजरा झाला. या निमित्ताने बाबा रामदेव यांनी एका वृत्तवाहिनाशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
जगभरात कोरोनाचा थैमान सुरू आहे. त्यामुळे कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जगभरात लसीकरण मोहीम सुरु केली आहे. पण लसीकरणावरून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. लस घेतल्यानंतरही अऩेकांना कोरोनाची लागण झाली आहे. ज्यांना एकदा कोरोना झाला होता त्यांना 6 महिन्यात पुन्हा झाला. यावर योगगुरु बाबा रामदेव म्हणाले की, लसीकरणाच्या सहा महिन्यांनंतर रोग प्रतिकारक क्षमता संपते.
अशात सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क व्यतिरिक्त आपली इम्युनिटी वाढवणे आवश्यक आहे. यासाठी गिलोय आणि तुळशीच सेवन करावे आणि अनुलोम-विलोम योग करावा असा सल्ला त्यांनी यावेळी दिला. तसेच आपण कोरोना लसीकरणाच्या विरोधात नसल्याचेही बाबा रामदेव यांनी स्पष्ट केले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
बाबा रामदेव म्हणाले की, लसीकरणानंतर शरीरात ज्या अँटीबॉडीज तयार होतात. जर तुम्ही योग केला तर 30 ते 50 टक्के अधिक अँटीबॉडीज वाढतात. त्यामुळे लसीकरणासोबतच योग करणेही गरजेचे आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे लोकांचा मृत्यू होत नाही. तर बीपी, रेस्परेटरी आणि हृदयासारख्या गंभीर समस्यांमुळे लोकांचा मृत्यू होत असल्याचा दावा त्यांनी केला. कोरोनापासून वाचण्यासाठी मास्कचा वापर नियमित करा.पण त्यासोबतच योग आणि आयुर्वेदाचा डबल डोसही नक्की घ्यावा असे ते म्हणाले. कोरोनामुळे अनेकदा पचनाच्या समस्या निर्माण असतात. त्यामुळे पचनासाठी चांगल्या असतील अशाच पदार्थांचे सेवन करावा असा सल्ला त्यांनी दिला.
मुळात कोरोना हा रोग नाही, कोणत्या शहाण्याने हा मास्क लावण्याचा सिद्धांत काढला, मूर्खपणा आहे, ऐका काय म्हणाले संभाजी भिडे #Corona #disease #mask #stupid #SambhajiBhide #संभाजीभिडे #surajyadigital #सुराज्यडिजिटलhttps://t.co/RNmTK7oRLC
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 8, 2021
* रामदेवबाबांना भरघोस नफा
गेल्या काही दिवसांपासून शेअर मार्केटमध्ये चांगलाच चढ-उतार झाल्याचे पाहायला मिळत आहे. सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी बाजार तब्बल ८७० अंकांनी कोसळला. मात्र, असे असले तरी योगगुरू बाबा रामदेव यांच्या एका कंपनीला भरघोस नफा झाल्याची माहिती मिळाली आहे.
मुळात कोरोना हा रोग नाही, कोणत्या शहाण्याने हा मास्क लावण्याचा सिद्धांत काढला, मूर्खपणा आहे – संभाजी भिडे https://t.co/AXb8Q5WVTd
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 8, 2021
न्यूट्रिला ब्रॅण्डचे उत्पादन करणाऱ्या रुचि सोया या कंपनीचे शेअर्स वधारले. ०१ एप्रिल २०२१ पासून नवीन आर्थिक वर्ष सुरू झाले. यानंतर पुढील दोनच दिवसात रुचि सोया कंपनीचे शेअर्स तब्बल १० टक्क्यांनी वाढल्याचे सांगितले जात आहे. नवीन वर्षाच्या दुसऱ्या दिवशी गुड फ्रायडेनिमित्त शेअर बाजार बंद होता.