नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही चर्चा झाली. यावेळी देशभरात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले. कोरोना नियंत्रणासाठी सध्या संपूर्ण लॉकडाऊनची गरज नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, मायक्रो कन्टेन्मेंटवर भर द्यावी लागणार असल्याचे ते म्हणाले.
महाराष्ट्रात आज नव्याने 56 हजार 286 नवे रुग्ण, 376 बळी; मुंबईत 8,938 तर मृत्यू 23 #mumbai #maharashtra #corona #सुराज्यडिजिटल #surajyadigital pic.twitter.com/ZunUSntMLi
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 8, 2021
आपल्याला कोरोना व्हायरससोबत कोरोना लसीशिवाय लढायचे आहे हे लक्षात ठेवायला हवे. यामुळे कोरोना चाचण्यांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, कोरोना चाचण्या वाढवायला हव्यात, असे मोदी यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.
मी कोरोना लसीकरणाच्या विरोधात नाही, पण… बाबा रामदेव https://t.co/jyp3fsoWyL
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 8, 2021
कोरोनाच्या या संकटात पुन्हा एकदा लोकांना मास्क, सोशल डिस्टंन्सिंग आदी गोष्टी पाळण्याबाबत जागरूक करायला हवे. आपण मृत्यूदर कमी केला पाहिजे. लोकांची माहिती असल्यास आपल्याला त्यांचे जीव वाचविता येतील.
पुन्हा लॉकडाऊनची चर्चा, मोदींची आज मुख्यमंत्र्यांशी चर्चा #surajyadigital #pm #cm #सुराज्यडिजिटल #चर्चा #lockdowan #लॉकडाऊन pic.twitter.com/M1aa97vBwi
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 8, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
कोरोनाचे रुग्ण वाढल्याने एकीकडे राजकारण रंगलेले असताना मोदींनी मुख्यमंत्र्यांना हे आदेश दिले आहेत. सर्व राज्यांनी कोरोना टेस्टिंगची व्याप्ती वाढवावी. 70 टक्के RT-PCR टेस्ट झाल्या पाहिजेत. देशातील, राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढला तरी चालेल, परंतू चाचण्या वाढवायला हव्यात. योग्य पद्धतीने स्वॅब घेणे खूप गरजेचे आहे, तसेच त्याची चाचणी होणेदेखील खूप महत्वाचे आहे, असे मोदी म्हणाले.
मुळात कोरोना हा रोग नाही, कोणत्या शहाण्याने हा मास्क लावण्याचा सिद्धांत काढला, मूर्खपणा आहे – संभाजी भिडे https://t.co/AXb8Q5WVTd
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 8, 2021
कोरोनाचा विळखा कमी करण्यासाठी आणि कोरोनावर मात करण्यासाठी रुग्णांचा शोध आणि त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेणे गरजेचे आहे. युद्धपातळीवर हे काम करण्याची गरज आहे. आपल्याला आता पुरेसा अनुभव आलेला आहे. तसेच सोबत अन्य स्त्रोतांसह लसही आहे, असे मोदी यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.
* लसीकरण उत्सव साजरा करा
देशात कोरोना रुग्ण वाढण्याचे नेमके कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत सांगितले आहे. आपण कोरोना लसीकरणाच्या नादात कोरोना चाचण्यांकडे दुर्लक्ष केले आणि कोरोना बाधितांचा आकडा वाढण्यास सुरुवात झाल्याचे मोदी म्हणाले. तसेच येत्या 11 ते 14 एप्रिलपर्यंत ‘लसीकरण उत्सव’ साजरा केला जाणार असल्याची घोषणा नरेंद्र मोदी यांनी केली आहे.