नांदेड : जिल्ह्यातील देगलूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार रावसाहेब जयवंतराव अंतापूरकर (वय 63) यांचे मुंबई येथे उपचारादरम्यान शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली,एक मुलगा,जावई, नातवंडे असा परिवार आहे.
रावसाहेब अंतापूरकर यांनी 2009 आणि 2019 या दोन निवडणुकांत देगलूर मतदारसंघातून विजय मिळवला होता.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
व्यवसायाने अभियंता असलेले अंतापूरकर हे 2009 पासून काँग्रेस पक्षाशी जोडले गेले होते. त्यांच्या निधनाने पक्षाने एक शांत, संयमी नेता गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.
गेले काही दिवस ते मुंबई येथील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत होते. 25 दिवसापूर्वी कोरोनाचा संसर्ग झाला होता. तेव्हा स्वतः त्यांनी जनतेला काळजी घेण्याचे आवाहन केले होते. नांदेड येथील भगवती रुग्णालयात 3 दिवस उपचार घेतल्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी पुढील उपचारासाठी त्यांना मुंबई येथील बॉम्बे हॉस्पिटल येथे ऍडमिट केले. ते मागील 8 दिवसापासून अत्यवस्थ होते.