मुंबई : अखेर महाराष्ट्रात वीकेंड लॉकडाऊन लागू झाला आहे. आज (9 एप्रिल) रात्री 8 वाजतापासून सोमवारी ( 12 एप्रिल ) सकाळी 7 वाजेपर्यंत हा लॉकडाऊन लागू असणार आहे. यामध्ये फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. शनिवार आणि रविवार कडकडीत बंद असणार आहे. खूपच अत्यावश्यक काम नसताना घराबाहेर पडल्यास नागरिकांवर कारवाई होणार आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी 2 दिवस घरातच राहा, असे आवाहन करण्यात आले आहे.
आज सायंकाळपासून वीकेंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. राज्यात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यादरम्यान कोणते निर्बंध लागू असणार? सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरु राहणार का? खासगी वाहतूक व्यवस्थेविषयी नियम काय? याची गाईडलाईन्स राज्य सरकारकडून आज जारी करण्यात आल्या आहेत. सविस्तर जाणून घ्या.
एमपीएससीची परीक्षा अखेर पुढे ढकलली https://t.co/jthP3aIpuM
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 9, 2021
आपले सरकार सेवा केंद्र, पासपोर्ट सेवा, सेतू केंद्र आठवड्यात सकाळी 7 ते रात्री 8 सुरू राहू शकतात. वृत्तपत्रांमध्ये मासिके, नियतकालिके, जर्नल्स यांचा देखील आवश्यक सेवेत समावेश करण्यात आला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सुपरमार्केट, डी-मार्ट, बिग बाझार, रिलायन्स उघडे राहणार का ? कोणतही ठिकाण जे अत्यावश्यक वस्तू विकत असेल ते 4 आणि 5 एप्रिलला सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत कोरोनाच्या कडक निर्बंधांसह सुरु राहणार आहे. जर ते विविध वस्तू ज्या अत्यावश्यक वस्तूंमध्ये येत नाहीत त्या विकत असतील तर ते बंद राहतील. अत्यावश्यक सेवा सुरु राहतील. कोणीही व्यक्ती महत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू शकणार नाही. कोरोना नियमांचं पालन करत मार्केट सुरु राहणार, स्थानिक प्रशासनाला वाटलं की नियमांचं उल्लंघन होत आहे.तर, ते राज्य सरकारकडून परवानगी घेवून मार्केट बंद करु शकतात.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
गॅरेज सुरु राहतील, स्थानिक प्रशासनानं तिथे कोरोना नियमांचं पालन केलं जातेय का ते पाहावे. ऑटो पार्ट पुरवणारी दुकानं बंद राहतील. 4 एप्रिलच्या शासन निर्णयानुसार नागरीक दारु होम डिलिव्हरी पद्धतीनं खरेदी करु शकतात. मात्र, निश्चित करण्यात आलेल्या वेळेतचं दुकानांकडून सेवा दिली जाईल. उत्पादन शुल्क विभागाचे नियम पाळावे लागतीतल.
शेवंतानं 'या' स्त्रीला दिलं आपल्या अभूतपूर्व यशाचं श्रेय https://t.co/g6wLQA2aAi
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 9, 2021
रस्त्याशेजारील ढाबे सुरु असतील मात्र, तिथे देखील टेक अवे होम आणि होम डिलीव्हरी पर्याय उपलब्ध असेल.एसी, कुलर, फ्रीज दुरुस्ती दुकानं सुरु नसतील. लॅपटॉप, मोबाईल, कॉम्प्युटरची दुकानं बंद असतील. सेतू कार्यालय, नागरीक सेवा केंद्र सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरु असतील. रेस्टॉरंट आणि बार स्थानिक प्रशासनान लावलेल्या नियमांसह सकाळी 7 ते सायंकाळी 8 पर्यंत फक्त पार्सल सुविधेसह सुरु असतील.