मुंबई : कोरोनामुळे एमपीएससीची 11 तारखेची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात तातडीने आज बैठक बोलावली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. राज ठाकरेंसह अनेक नेत्यांनी ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. दरम्यान 11 एप्रिलला महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा होणार होती. नवी तारीख लवकरच जाहीर होणार आहे.
सोशलमीडियावर प्रसिद्ध झालेल्या चाचाचे 'वडापाव' सेंटर केले सील https://t.co/FKkNEdhX4u
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 9, 2021
राज्यात 11 एप्रिल रोजी होणारी राज्य सेवा परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना 11 एप्रिल रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी सर्व स्तरातून होत होती. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज बैठक बोलावली होती. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि अधिकारी यांच्यात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमार्फत ही बैठक पार पडली. त्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे रविवारी म्हणजेच 11 एप्रिलला महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा होणार होती.
#महाराष्ट्र लोकसेवाआयोगाची येत्या रविवारी म्हणजे ११ एप्रिल २०२१ रोजी होणारी ''महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब'' ची संयुक्त पुर्व परीक्षा 2020 पुढे ढकलण्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत एकमताने निर्णय @DDNewslive @DDNewsHindi #MPSC pic.twitter.com/R7rQcOsaa2
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) April 9, 2021
परंतु, या परीक्षेवर अनिश्चिततेचं सावट होतं. मात्र, परीक्षेबाबत सरकारकडून एमपीएससी प्रशासनाला कोणतीही सूचना मिळालेली नव्हती. त्यातच राज्य सरकारने 30 एप्रिलपर्यंत कठोर निर्बंध लावले असून शनिवारी आणि रविवारी असे दोन दिवस पूर्णपणे लॉकडाऊन आहे.
कुटुंब नियोजन केलं असतं तर लसींचा साठा कमी पडला नसता : उदयनराजे https://t.co/yHD0Y8mU8z
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 9, 2021
त्यामुळे परीक्षा 11 एप्रिलला होणार का असा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र, आता ही परीक्षा होणार नसल्याचे निश्चित झाले आहे.