लखनौ : आपल्याकडे निष्काळजीपणामुळे काय चमत्कार होतील हे कोणालाही सांगता येत नाही. असाच एक धक्कादायक नमूना उत्तर प्रदेशात पाहायला मिळाला आहे. येथे तीन वयस्कर महिलांना कोरोनाऐवजी चक्क रेबीजची लस देण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. यामुळे खळबळ माजली आहे.
दहावी, बारावी परीक्षा संदर्भात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड माहिती देताना #surajyadigital #सुराज्यडिजिटल #10th #12th #Exam #varshagaikwad https://t.co/4hz3LHA23t
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 9, 2021
लस दिल्यानंतर एका महिलेची प्रकृती प्रचंड बिघडली. यानंतर तिच्या नातेवाईकांनी मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्याकडे यासंबंधी तक्रार केली असता ही घटना उघडकीस आली. केंद्र आणि राज्य सरकार वारंवार पात्र लोकांना लस घेण्याचे आवाहन करत आहे. एकीकडे लसीकरणासाठी केंद्रांबाहेर लोक रांगा लावत असताना उत्तर प्रदेशातील या घटनेनंतर आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
शामली येथील आरोग्य केंद्रात सरोज, अनारकली आणि सत्यवती या लसीकरणासाठी पोहोचल्या होत्या. कोरोना लसीचा पहिला डोस घेण्यासाठी त्या पोहोचल्या असता तेथील आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्यांना बाहेरुन प्रत्येकी दहा रुपयांचं इंजेक्शन घेऊन येण्यास सांगितलं. यानंतर त्यांना कोरोनाऐवजी चक्क रेबीजची लस देण्यात आली.
कुटुंब नियोजन केलं असतं तर लसींचा साठा कमी पडला नसता : उदयनराजे https://t.co/yHD0Y8mU8z
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 9, 2021
* डॉक्टरांकडून कळाला प्रकार
तिन्ही महिला अशिक्षित आहेत. लस घेतल्यानंतर त्या घरी पोहोचल्या. यावेळी एका महिलेची प्रकृती बिघडली. नातेवाईकांनी महिलेला खासगी डॉक्टरकडे नेले असता आरोग्य केंद्राने लस दिल्यानंतर दिलेलं प्रिस्क्रिप्शन पाहून त्यांना धक्का बसला. यावेळी डॉक्टरांनी त्यांना महिलेला रेबीजची लस दिली असल्याचे नातेवाईकांना सांगितल्यावर हा प्रकार उघडकीस आला असून आता कठोर कारवाईची मागणी केली जाते आहे.