अहमदनगर : खाता का नेता, अक्का आठ नेता का?, पैसे की फिक्र नको खाते में लिख देता, असे म्हणणारे एक वडापाववाले चाचा अहमदनगर मधील संगमनेर तालुक्यात आपले लोकप्रिय वडापाव सेंटर चालवतात. आपल्या हटके बोलण्याच्या शैलीने ग्राहकांना आकर्षित करणाऱ्या या चाचांचे नाव मोहम्मद अन्सार आहे. ते आता सगळीकडेच वडापाव चाचा नावाने प्रसिद्ध झाले आहे.
#एपॉझिटिव्ह #ओपॉझिटिव्ह #Opositive #Apositive #universaldonar #bloodgroup #युनिवर्सलडोनर #रक्तगट
आजचा दै. सुराज्य #A+ #o+https://t.co/3Cfx93LYMU &
visit us : https://t.co/Nfgnb9HK8m pic.twitter.com/9CAhKOoayr— Surajya Digital (@SurajyaDigital) April 9, 2021
महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील समनापुरमध्ये राहणाऱ्या या चाचांनी नसीब वडापाव सेंटरला एक वेगळी ओळख निर्माण करुन दिली आहे. चाचांच्या या दुकानावर वडापावचे शौकीन नेहमीच गर्दी करुन असतात. हे चाचा त्यांच्या सेल्समनशिप करताना त्यांच्या हटके बोलण्यावरुन ओळखले जातात. ते ग्राहकांना इतके आकर्षित करतात कि एकदा त्यांच्याकडे आलेला ग्राहक पुन्हा त्यांच्याकडे वळून त्यांच्याकडेच येतात. नुकतेच यांच्या शैलीमुळे सोशल मीडियावर हे फेमस झाले आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मात्र त्यांच्या चहात्यांसाठी एक वाईट बातमी आहे कारण संगमनेरजवळील समनापूर येथे नशिब वडापाव सेंटर येथे वडापाव खरेदी करण्यासाठी प्रचंड गर्दी झाल्याचे आढळून आले.
अजित पवारांच्या सभेला गर्दी, पोलिसांकडून गुन्हा दाखल
https://t.co/Xba1w554Ay— Surajya Digital (@SurajyaDigital) April 9, 2021
संबंधीत वडापाव सेंटर चालकाने करोना प्रतिबंधात्मक उपाय योजनेचे नियम न पाळल्याने सदर वडापाव सेंटर सात दिवसांसाठी प्रशासनाने सील केले आहे. सदर वडापाव सेंटरवर वडापाव खरेदी करणार्यांनी सामाजिक अंतर न ठेवता, मास्क व सॅनिटायझरचा वापर न केला नसल्याचे आढळले. अंदाजे 50 पेक्षा जास्त व्यक्तींना जमा करुन घोळक्याने वडापाव विक्रीचा व्यवसाय सुरु असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले.
गटविकास अधिकारी सुरेश शिंदे यांच्या पथकाने जावून सदर वडापाव सेंटरचा पंचनामा केला. सदर अस्थापनेने करोना प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्याने नशिब वडापाव सेंटर मौजे समनापूर हे दुकान 5 मार्चपासून पुढील सात दिवसांसाठी बंद करण्यात आले आहे.
* कारवाईचे नागरिकांमधून स्वागत
समनापूर येथील नसीब वडापाव सेंटर तालुक्यासह जिल्ह्यात आपल्या चवदार वडापाव साठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे तालुक्यातील खवय्ये याठिकाणी नेहमीच गर्दी करत असतात, याशिवाय कोल्हार घोटी राज्य महामार्गावरून प्रवास करणारे बाहेरगावचे नागरिकही याठिकाणी थांबून आवर्जून येथील वडापावचा आस्वाद घेत असतात. त्यामुळे वडापाव सेंटरवर प्रशासनाकडून झालेली कारवाई दुर्दैवी असली तरी कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन करून व्यवसाय करावा असे मत यावेळी नागरिकांनी व्यक्त केले.