बंगळुरु : कर्नाटकच्या मैसूरमधील एका महिलेनं लग्नासाठी दिलेली जाहिरात व्हायरल होत आहे. मॅट्रीमोनिअल साईटच्या माध्यमातून 73 वर्षीय सेवानिवृत्त शिक्षिकेने ही जाहिरात दिली आहे. ‘मी एका ब्राह्मण नवरदेवाचा शोध घेत आहे, मला माझ्यासोबत वेळ घालवण्यासाठी एका जोडीदाराची गरज आहे.’ असं जाहिरातीत आहे. यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या आहेत. काहींनी शुभेच्छा दिल्या आहेत, तर काहींनी फसवणुकीपासून वाचण्याचा सल्ला दिला आहे.
पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव, रॉयल चॅलेंजर्सची विजयी सलामी https://t.co/ZZ1JMTRyIO
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 10, 2021
ही जाहिरात सध्या चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे. ही घटना आहे कर्नाटकच्या मैसूरमधील. लग्नासाठी जाहिरात देणं यात काही नवल नाही, मात्र ही बातमी खास ठरते या महिलेच्या वयामुळे. मॅट्रीमोनिअल साईटच्या माध्यमातून लग्नासाठी जोडीदार शोधणाऱ्या या महिलेचं वय 73 वर्ष आहे. सरकारी नोकरीतून सेवानिवृत्त असलेल्या या महिलेच्या निर्णयाची सगळीकडेच चर्चा रंगली आहे. लोकांचं म्हणणं आहे, की वयाच्या या टप्प्यात पुन्हा संसार उभा करण्याची इच्छा ठेवणं खूप मोठी गोष्ट आहे.
महाराष्ट्रात दहा दिवसांचा लॉकडाऊन होणार का ? आज सर्वपक्षीय बैठक https://t.co/3aOr6ylj6o
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 10, 2021
हाती आलेल्या वृत्तानुसार, जाहिरातीमध्ये महिलेनं म्हटलं आहे, की त्या 73 वर्षीय सेवानिवृत्त शिक्षिका आहेत. मी एका ब्राह्मण नवरदेवाचा शोध घेत आहे, जो माझ्यापेक्षा मोठा असेल. मला माझ्यासोबत वेळ घालवण्यासाठी एका जोडीदाराची गरज आहे. वृत्तपत्रात छापलेली ही जाहिरात सोशल मीडियावर सध्या चांगलीच व्हायरल झाली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
लोक यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काहींनी महिलेला शुभेच्छा दिल्या आहेत, तर काहींनी फसवणुकीपासून वाचण्याचा सल्लाही दिलाय.
वयाच्या या टप्प्यात महिलेच्या आयुष्यात खूप एकटेपण आहे. त्यांनी सांगितलं, की त्यांच्या कुटुंबात आता कोणीच नाही. नवऱ्यासोबत त्यांचा खूप आधीच घटस्फोट झाला आहे आणि आई वडीलांच्या निधनानंरतर त्या पूर्णपणे एकट्या आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार,त्यांना एकटीला भीती वाटते, म्हणूनच आता त्या जोडीदाराचा शोध घेत आहेत. जेणेकरुन उरलेलं आयुष्य एखाद्या खास व्यक्तीसोबत घालवता यावं.
कोरोना लस घ्या; फ्री बियर ,जेवण, गांजा मिळवा
https://t.co/cC2ouU3ml9— Surajya Digital (@SurajyaDigital) April 10, 2021
महिलेनं सांगितलं, की त्यांचं वैवाहिक जीवन अत्यंत वाईट होतं. त्यामुळे, त्यांनी कधीच दुसऱ्या लग्नाचा विचार केला नाही. मात्र, आयुष्याच्या या टप्प्यात त्यांना एका जोडीदाराची गरज आहे. ज्याच्यासोबत त्या आपलं सुख, दुःख वाटू शकेल. ज्याच्यासोबत त्या आपला एकटेपणा दूर करण्यासाठी बातचीत करतील.