नवी दिल्ली : नागरिकांनी कोरोना लस टोचून घेतली तर त्या बदल्यात त्यांना रेस्टॉरन्टमध्ये मोफत जेवण, बीयर, दारू, गांजा अशा अनेक ऑफर्स देण्यात येत आहेत. ऐकून आश्चर्य वाटतंय ना? हो अशी शक्कल लसीचे प्रमाण वाढण्यासाठी एका देशाने अवलंबली आहे.
जगातील अनेक देशांत कोरोनाची लस अजूनही उपलब्ध झाली नसताना काही देशांत मात्र लसीचा साठा मुबलक प्रमाणात असतानाही लोक कोरोनाची लस टोचून घेण्यास अनुत्साही असल्याचं दिसून आलंय. चीनलाही हीच समस्या भेडसावत असून त्यावर आता चीनी सरकारने अनोखी शक्कल लढवली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
चीनमध्ये कोरोनाच्या अनेक कंपनीच्या वेगवेगळ्या लसी उपलब्ध आहेत. पण तरीही त्या देशात कोरोनाच्या लसीकरणाच्या कार्यक्रमाला गती मिळत नाही. देशातील नागरिक कोरोना लस टोचून घ्यायला अनुत्साही दिसत आहेत. मग यावर उपाय म्हणून चीनच्या सरकारने आणि खासगी कंपन्यांनी ही अनोखी शक्कल लढवली आहे. नागरिकांनी कोरोना लस टोचून घेतली तर त्या बदल्यात त्यांना रेस्टॉरन्टमध्ये मोफत जेवण, बीयर, दारू, गांजा अशा अनेक ऑफर्स चीनी सरकारकडून देण्यात येत आहेत.
महाराष्ट्रात दहा दिवसांचा लॉकडाऊन होणार का ? आज सर्वपक्षीय बैठक https://t.co/3aOr6ylj6o
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 10, 2021
पण जर नागरिकांनी कोरोनाची लस टोचून घेतली नाही तर मात्र त्यांना अनेक गोष्टींचा सामना करावा लागणार आहे. अशा कर्मचाऱ्यांना आपली नोकरी गमवावी लागणार असल्याचं खासगी उद्योगांनी स्पष्ट केलंय. तसेच अशा नागरिकांच्या मुलांना शाळेतून काढून टाकण्यात येईल आणि त्यांच्या घरावरही जप्ती येऊ शकेल असं चीनी सरकारने स्पष्ट केलंय. त्यामुळे कोरोनाची लस न घेणं आता चीनी नागरिकांना महागात पडण्याची शक्यता आहे.