सातारा : कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्यात वीकेंड लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. साताऱ्यातही वीकेंड लॉकडाऊन पाळण्यात येत आहे. परंतू खासदार उदयनराजे भोसले यांनी या लॉकडाऊनला विरोध केला आहे. त्यांनी या निर्णयाविरोधात पोवई नाका येथे आंदोलन पुकारले. आंब्याच्या झाडाखाली पोतं टाकून बसत थाळी ठेवून भीक मांगो आंदोलनास त्यांनी सुरूवात केली.
राज्य सरकारने लागू केलेल्या लॉकडाऊनविरोधात भाजपाचे राज्यसभा खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी विरोध केला. साताऱ्यातील पोवई नाका येथे उदयनराजेंनी चक्क कटोरा घेऊन रस्त्यावर भीक मांगो आंदोलन केले. यावेळी विविध विषयावरून उदयनराजेंनी ठाकरे सरकारवर जोरदार घणाघात केला.
सातारा : लॉकडाऊनला विरोध करीत खासदार उदयनराजे यांनी भीकमांगो आंदोलन केले. #surajyadigital #सुराज्यडिजिटल #udhyanraje #lockdown #satarahttps://t.co/NmJsD1Y0Pk
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 10, 2021
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करत त्यासमोरील झाडाखाली पोती टाकून बसत थाळी ठेवून भीक मागो आंदोलन केले. यावेळी उदयनराजे यांनी सचिन वाझे प्रकरणासह इतर सर्वच विषयांवर राज्यसरकारवर टीका केली. या आंदोलनामुळे साताऱ्यातील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
उदयनराजे म्हणाले की, राज्य शासनात जी तज्ज्ञ मंडळी बसली आहेत, ती तज्ज्ञ वाटत नाहीत. मी व्यापारी असतो तर दुकान उघडे ठेवले असते. लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ आलीय, कोरोना रोखण्यासाठी लॉकडाऊन पर्याय असू शकत नाही. लोकं ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. सणासुदीचे दिवस आल्याने व्यापाऱ्यांनी कर्ज काढून माल भरला आहे. बँकेचे हप्ते भरायचे आहेत, उद्यापासून नो लॉकडाऊन जर संघर्ष झाला तर त्याची जबाबदारी तुमची असेल असा इशारा त्यांनी ठाकरे सरकारला दिला.
राजकीय नेत्यांना घरी जाऊन लस का? कोर्टाचा शरद पवारांना नाव न घेता टोला ! https://t.co/1ZcdEMlR6j
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 10, 2021
यावेळी भीक मांगो आंदोलनात जमा केलेले ४५० रुपये घेऊन खासदार उदयनराजेंनी चालत थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठलं. राज्य सरकारनं लॉकडाऊनचा पुनर्विचार करावा अशी मागणी त्यांनी केली. तसेच मी दुकानदार अथवा व्यापाऱ्यांच्या बाजूने बोलत नाही तर सर्वसामान्यांच्या बाजूने बोलतोय. तुम्ही सगळं बंद करून उपासमारीची वेळ आणली आहे. आज जी परिस्थिती आली आहे त्यासाठी तुम्ही जबाबदार आहात, तुमचे काळे कारनामे लपवण्यासाठीच लॉकडाऊन केलाय अशी टीकाही खासदार उदयनराजेंनी ठाकरे सरकारवर केली.
एकीकडे खासदार उदयनराजे सरकारविरोधात आंदोलन करून रस्त्यावर कटोरा घेऊन दिसले तर दुसरीकडे सातारचे खासदार श्रीनिवास पाटील लॉकडाऊनमधील वेळ सत्कारणी लावत शेतात काम करत असल्याचा फोटो व्हायरल झाला.
सातारा : लॉकडाऊनला विरोध करीत खासदार उदयनराजे यांनी भीकमांगो आंदोलन केले. प्रसार माध्यमांनी दिली संतप्त प्रतिक्रिया #surajyadigital #सुराज्यडिजिटल #udhyanraje #lockdown #satarahttps://t.co/5QzpK6Dhpy
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 10, 2021
* जनतेत उद्रेक होणार
कोरोना काळात लावण्यात आलेल्या कठोर निर्बंधांमुळे सर्वसामान्य माणसांमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे. जर लॉकडाऊन सारखी परिस्थिती कायम राहणार असेल तर या दरम्यान बुडणाऱ्या रोजगाराची भरपाई सरकारने थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करून जनतेला किमान दिलासा द्यावा. अन्यथा जनतेत उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही, असा कडक इशारा भाजपाचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी काही दिवसांपूर्वी दिला होता.
* थाळी ठेवून भीक मांगो आंदोलन
कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्यात वीकेंड लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. साताऱ्यातही वीकेंड लॉकडाऊन पाळण्यात येत आहे. परंतू खासदार उदयनराजे भोसले यांनी या लॉकडाऊनला विरोध केला आहे. त्यांनी या निर्णयाविरोधात पोवई नाका येथे आंदोलन पुकारले. आंब्याच्या झाडाखाली पोतं टाकून बसत थाळी ठेवून भीक मांगो आंदोलनास त्यांनी सुरूवात केली आहे.