सोलापूर : सोलापूरचे कामगार नेते नरसय्या आडम मास्तरांचा दिल्लीत ‘भारत ज्योती’ पुरस्काराने सन्मान झाला. या पुरस्काराचे वितरण काल (शुक्रवारी) दिल्ली येथील लोधा गार्डन सभागृहात झाले. इंडिया इंटरनॅशनल फ्रेंडशीप सोसायटीच्या पदाधिका-यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केला. यावेळी पत्नी, नगरसेविका कामिनी आडम, चिरंजीव डॉ.किरण आडम उपस्थित होते.
लॉकडाऊन करायची वेळ आलीय – उद्धव ठाकरे https://t.co/1YcaLdVpo5
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 10, 2021
इंडिया इंटरनॅशनल फ्रेंडशिप सोसायटी, (दिल्ली) ही आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणारी नामांकीत संस्था व संशोधन केंद्र आहे. या संस्थेच्या वतीने दरवर्षी आर्थिक विकास,सामाजिक विकास, कला,क्रीडा,सांस्कृतिक विकास, साहित्य,संशोधन, राजकारण या विविधांगी क्षेत्रात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या उपक्रमशील व्यक्तींचा भारत ज्योती पुरस्कार देऊन गौरव केला जातो.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
यंदा राज्यातून आर्थिक विकास व राष्ट्रीय एकीकरणासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे केंद्रीय समिती सदस्य,महाराष्ट्र प्रदेश सचिव तथा माजी आमदार ज्येष्ठ नेते कॉ.नरसय्या आडम मास्तर यांना भारत ज्योती पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. आजपर्यंत हा पुरस्कार मदर तेरेसा,राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल,मुख्यमंत्री कलाकार, साहित्यिक, क्रीडापटूशास्त्रज्ञ आदींना मिळाला. यंदा हा बहुमान सोलापूर च्या आडम मास्तरांना मिळाला.
लॉकडाऊनला विरोध; उदयनराजेंचे 'भीक मांगो' आंदोलन, एका खासदाराचे अनोखे आंदोलन तर दुसरे शेतकामात व्यस्तhttps://t.co/qOfKWr6AXG
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 10, 2021
दरम्यान, महाराष्ट्र शासनाच्या वतीने उत्कृष्ट विधानसभापटू पुरस्कार देऊन तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात आले होते. गेल्या पाच दशकात अनेक पुरस्कार, सम्मान कॉ.आडम मास्तरांना मिळाले.पण आज दिल्ली येथे झालेला सन्मान हा महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारांचा, कामगार चळवळीचा, श्रमणाऱ्या हातांचा, नागरिकांनी केलेल्या अखंडीत जन आंदोलनाचा सन्मान आहे, अशा शब्दांत कृतज्ञता व्यक्त करत हा भारत ज्योती पुरस्कार चळवळीला समर्पित केला.
सातारा : लॉकडाऊनला विरोध करीत खासदार उदयनराजे यांनी भीकमांगो आंदोलन केले. #surajyadigital #सुराज्यडिजिटल #udhyanraje #lockdown #satarahttps://t.co/NmJsD1Y0Pk
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 10, 2021