मुंबई : महाराष्ट्रात विकेंड लॉकडाऊन सुरू झाला आहे. सोमवारी ( 12 एप्रिल) सकाळी 7 वाजेपर्यंत हा लॉकडाऊन लागू असणार आहे. आज शनिवार व उद्या रविवार कडकडीत बंद असणार आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी 2 दिवस घरातच राहा, असे आवाहन करण्यात आले आहे. अत्यावश्यक काम नसताना घराबाहेर पडल्यास कारवाई होणार आहे. दरम्यान अनेक शहरात सध्या रस्त्यांवर शुकशुकाट दिसून आला आहे.
कोरोना संकटामुळे महाराष्ट्रात संपूर्ण लॉकडाऊन करण्याचा विचार सुरू आहे. राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राज्यात दहा दिवसांच्या लॉकडाऊनची गरज आहे, असे म्हटले आहे. तर आज सर्वपक्षीय बैठक होणार आहे. यात राज ठाकरे, देवेंद्र फडणवीसांसह प्रमुख नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या बैठकीत महाराष्ट्रात संपूर्ण लॉकडाऊन लावायचा की नाही? यावर अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
वीकेंड लॉकडाऊनची नियमावली जाहीर, हे राहणार चालू आणि बंद https://t.co/CQa53pRFfj
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 9, 2021
पहिल्याच विकेंड लॉकडाऊनला राज्यात पुढील 10 दिवस कडक लॉकडाऊन लावण्याचा प्रस्ताव आला आहे. कारण पुढील 12 ते 18 एप्रिल दरम्यान दोन सार्वजनिक सुट्या आल्यात. त्यामुळे फक्त गुरूवार आणि शुक्रवार दोनच दिवस अधिकृत कामाचे असणार आहेत. त्याला लागूनच पुढील शनिवार आणि रविवारचा विकेंड लॉकडाऊन सुरू होणार आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
परिणामी दोन दिवसांसाठी नागरिकांची कामाच्या ठिकाणी गर्दी होणार. त्याएवजी सलग लॉकडाऊन केला तर नागरिकांची गर्दी टाळून कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी करता येऊ शकते.
सातारा : लॉकडाऊनला विरोध करीत खासदार उदयनराजे यांनी भीकमांगो आंदोलन केले. #surajyadigital #सुराज्यडिजिटल #udhyanraje #lockdown #satarahttps://t.co/NmJsD1Y0Pk
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 10, 2021
असे केल्यास सध्या अतीवेगाने वाढणारा कोविड 19 संसर्गाची साखळी तोडण्यास हा 10 दिवसांचा कडक लाँकडाऊन महत्वाचा ठरू शकतो. सलग 10 दिवस 100% कडक लॉकडाऊन घोषीत करण्यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील सर्व पक्षीय नेत्यांशी चर्चा करणार आहेत. शनिवारी दुपारी होणाऱ्या या बैठकीकडे सर्व राज्याचं लक्ष लागलं असेल.
पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव, रॉयल चॅलेंजर्सची विजयी सलामी https://t.co/ZZ1JMTRyIO
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 10, 2021
राज्यात सध्या दररोज कोविड 19 संसर्ग बाधित रुग्णांची जी संख्या समोर येतेय ती पाहून राज्याचे आरोग्य विभागातील वरिष्ठ डाँक्टर राज्य सरकारला 100% लॉकडाऊनचाच सल्ला देत आहेत. पण राज्यातील सर्व वर्गातील नागरिकांचं अर्थ चक्र पुन्हा कडक लॉकडाऊनमुळे डबघाईला येऊ नये यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सुवर्णमध्य साधत निर्णय घेत आहेत. पण येत्या काही दिवसांत कोविड 19 संसर्ग परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कठोर निर्णय घ्यावा लागणार असं दिसतंय.