नवी दिल्ली : सीबीएसईच्या परीक्षांबाबत मोठा निर्णय झाला आहे. सीबीएसई बोर्डाच्या 10 वीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना पास केले जाणार आहे. तर सीबीएसई बोर्डाची 12 वीची परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली आहे. ही परीक्षा 4 मे रोजी होणार होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री, शिक्षण खात्याचे सचिव, इतर महत्वाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक केली होती. यात हा निर्णय घेण्यात आला.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना कोरोना, अखिलेश यादवही पॉझिटिव्ह https://t.co/fYqFth3QXc
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 14, 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीबीएसई बोर्ड परीक्षांच्या संदर्भात 12 वाजता बैठक घेतली. या बैठकीला केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक, सीबीएसईचे सचिव आणि महत्त्वाचे अधिकारी उपस्थित होते, अशी माहिती आहे. या बैठकीमध्ये सीबीएसईच्या बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. तर, दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं दहावीच्या परीक्षा रद्द केल्याची माहिती दिली आहे. दहावीचा निकाल सीबीएसई बोर्डाकडून वस्तूनिष्ठ पद्धतीनं तयार करण्यात आलेल्या मानाकांच्या आधारे जाहीर करण्यात येणार आहे.
हनुमानांचा जन्म कुठे झाला? दोन राज्यांत वाद, अधिकृत घोषणा होणार रामनवमीला https://t.co/ut1nC26rbY
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 14, 2021
तर, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. परीक्षा घेण्यासंदर्भात 1 जूनला परिस्थितीची पाहणी करण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं दिली आहे. त्यामुळे सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा जूनपर्यंत होणार का? हे पाहावं लागेल.
* या लोकांनी केली होती मागणी
सीबीएसई बोर्डाच्या लेखी परीक्षेला 4 मे पासून सुरुवात होणार होती. सध्या देशात दररोज 1 लाखांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी बोर्ड परीक्षा रद्द करा, अशी मागणी सोशल मीडियावर केली होती. विद्यार्थ्यांच्या या मागणीला अभिनेता सोनू सूद, गायक अरमान मलिक, काँग्रेस नेते राहूल गांधी, प्रियांका गांधी, नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी परीक्षा रद्द करावी किंवा दुसरा मार्ग काढण्यात यावा, अशी मागणी केली होती.