मुंबई : राज्यात आज (14 एप्रिल) रात्री 8 वाजेपासून 144 कलम लागू करण्यात येणार आहे. पुढील 15 दिवस ही हे जमावबंदीचे कलम लागू असणार आहे. आवश्यक कामाशिवाय कुणालाही बाहेर फिरता येणार नाही. या काळात आवश्यक सेवा वगळून इतर सेवा बंद राहतील. सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत अत्यावश्यक सेवा सुरु राहतील. त्यामुळे गरज असेल तरच बाहेर पडा, असे आवाहन करण्यात आले आहे.
कोरोनाबरोबरच युद्ध पुन्हा सुरू झालंय, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणालेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गुढीपाडव्याच्या निमित्तानं जनतेला संबोधित करत आहेत. यावेळी कोरोनानं राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीची विदारकता ते सांगत आहेत. मधल्या काळात हे युद्ध आपण जिंकत आलेलो असल्याचं वाटत होतं. त्या युद्धाला पुन्हा एकदा सुरुवात झालीय. फार भयानक पद्धतीने ही रुग्णवाढ झालेली आहे. आजचा रुग्णांचा आकडा हा सर्वात उच्चांक गाठणारा आकडा आहे, असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलंय.
आयपीएल २०२१ : रोमांचक सामन्यात मुंबई इंडियन्स विजयी, गुणतालिकेत दुसरे स्थान https://t.co/MZrGhvkSXU
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 14, 2021
मधल्याकाळात एमपीएससी, दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या, कोव्हिडची लाट कमी झाली की, ती लाट पुढे घेऊ शकतो. पण आपली जी परीक्षा आहे, त्यावर आपल्याला उत्तीर्ण व्हावंच लागेल. ऑक्सिजनची कमतरता जाणवत आहे. मी मुद्दाम आपल्याला सांगतोय. मी सगळ्या घटकांशी बोलतोय. साहजिकच मतमतांतर असू शकतात. पण किती काळ चर्चा करायचं. हे आता परवडणारं नाही. कारण आता हा जो वेळ निघून गेला तर मदतीला कोणही येणार नाही. राज्यात दोन बाराशे मेट्रीक टेनचं उत्पादन करतो. हा संपूर्ण ऑक्सिजन फक्त कोरोना रुग्णांसाठी वापरतो आहोत, असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणालेत.
हरिद्वारच्या कुंभमेळ्यात ४०० हून अधिक भाविकांना कोरोनाची लागण, उद्या तिसरे शाहीस्नान https://t.co/Fv78NU8nJ1
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 13, 2021
राज्यात 144 कलम लागू करण्यात आला असून, पुढील 15 दिवस संचारबंदी राहणार आहे. अनावश्यक येण-जाणं पूर्णपणे बंद करण्यात आलेय. अत्यावश्यक काम नसेल तर घराबाहेर पडू देणार नाही. सर्व आस्थापना, सार्वजनिक ठिकाणे बंद राहतील. सकाळी 7 ते रात्री 8 अत्यावश्यक सेवा, सुविधा सुरु राहतील, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. बस, लोकल सेवांसह अत्यावश्यक सेवांसाठी सार्वजनिक वाहतूक सुरु राहणार आहे. रुग्णालय, वैद्यकीय सेवा, वाहतूक सप्लाय चेन, लस उत्पादक आणि वाहतूक करणारे, मास्क, जंतूनाशक उत्पादक आणि वितरक, जनावरांचे दवाखाने, बस, ऑटो, राजनैतिक कार्यालये, पावसाळी कामे सुरु राहतील, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय.
* पंतप्रधानांकडून मुख्यमंत्र्यांची मागणी
आम्हाला इतर राज्यातून ऑक्सिजन आणण्यासाठी परवानगी द्या, अशी विनंती केली. पंतप्रधानांनी ईशान्य राज्यांतून ऑक्सिजन आणण्यास मंजुरी दिली आहे. ही राज्य हजारो किमी दूर आहेत. आपल्याला सुरळीत पुरवठा हवा आहे. त्यासाठी पंतप्रधान यांच्याकडे विनंती करतोय. हे ऑक्सिजन रस्त्याने आणेपर्यंत फार विचित्र परिस्थिती होऊ शकतो. त्यामुळे लष्करी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार हवाई मार्गाने आम्हाला ऑक्सिजन पुरवठा करा. कारण रस्ते मार्गाने ते शक्य नाही.
महाराष्ट्रात उद्यापासून पंधरा दिवस कडक संचारबंदी #surajyadigital #संचारबंदी #सुराज्यडिजिटल pic.twitter.com/xg10iKeEbp
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 13, 2021
* 5 हजार 400 कोटींची अशी मिळणार मदत
राज्य सरकार म्हणून अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांना एक महिन्यासाठी प्रत्येकी तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ देणार आहोत. या योजनेमध्ये सात कोटी नागरिकांचा समावेश आहे. दहा रुपयांची शिवभोजन थाळी पाच रुपयांवर आणली होती. पुढचे काही दिवस शिवभोजन थाळी मोफत देणार आहोत. संजय गांधी निराधार, श्रावळ बाळ योजना, इंदिरा गांधी निवृत्ती योजना अशा पेन्शन लाभार्थ्यांना 1 हजार रुपये आगाऊ देणार आहोत. यामध्ये 35 लाख लोकांचा समावेश आहे. महाराष्ट्र राज्य इमारत कामगार कल्याण मंडळ आहे. त्यात 12 लाख लाभार्थी आहेत. त्यांना 1500 रुपये देणार आहोत.
महाराष्ट्रात उद्यापासून १५ दिवस कडक संचारबंदी, ऐका मुख्यमंत्री ठाकरेंच्या तोंडून नियमावली, आणि नियोजन #surajyadigital #संचारबंदी #मुख्यमंत्री #ठाकरे #संवाद #गुढीपाडवा #नववर्ष #remadisiver #रेमडीसीवर #सुराज्यडिजिटल #CM #CMOMaharashtrahttps://t.co/jIM4skmrnu
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 14, 2021
नोंदणीकृत घरेलू कामगार यांना निधी देणार आहोत. अधिकृत फेरीवाले यांना एका वेळेचे 1500 रुपये देत आहोत. यांची संख्या 5 लाख आहे. रिक्षा चालकांना 1500 रुपये देत आहोत. यांची संख्या 12 लाख आहे. आदिवासी कुटुंबाना प्रति कुटुंब 2000 रुपये देत आहोत. त्यांची संख्या 12 लाख आहे. कोविड संदर्भातील उभारणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना अतिरिक्त निधी 3300 कोटी कोविडसाठी बाजूला काढून ठेवत आहोत. हे सगळ करण्यासाठी 5 हजार 400 कोटी रुपये निधी बाजूला काढून ठेवत आहे, अशी माहिती उद्धव ठाकरेंनी दिलीय.