नवी दिल्ली : देशभरामध्ये सोमवारी (१२ एप्रिल) चंद्रदर्शन झाले नाही. त्यामुळे तरावीह १३ एप्रिलपासून सुरू होणार आहे. पहिला रोजा आज बुधवारी होत आहे.
नियमाप्रमाणे बाजार बंद असण्याची शक्यता आहे. त्यामुळे खरेदीसाठी गर्दी होणार नाही. एखादे वैश्विक संकट आल्यास आपण घरीच राहून नमाज अदा करू शकतो. इस्लामचा कायदा शरीयतनुसार अशी मुभा देण्यात आलेली आहे. त्यामुळे गर्दी न करता घरी राहूनच नमाज अदा करावी. राज्य शासनाच्या आदेशाचे सर्वजण पालन करून हा आजार दूर घालविण्यासाठी प्रयत्न करतील, अशी आशा त्या त्या शहरातील काझी यांनी व्यक्त केला.
आयपीएल २०२१ : रोमांचक सामन्यात मुंबई इंडियन्स विजयी, गुणतालिकेत दुसरे स्थान https://t.co/MZrGhvkSXU
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 14, 2021
रमजान महिना हा अल्लाहच्या कृपेचा महिना आहे. या महिन्यात आम्ही सर्व मिळून अल्लाहकडे दुवा मागणार आहोत. जगावर जे कोरोनाचे संकट आले आहे, त्यापासून सकल मानवजातीची रक्षा करण्यासाठीची प्रार्थना या महिन्याभरात करण्यात येईल. ज्यांना हा आजार झाला आहे ते लवकरात लवकर बरे व्हावेत. हा आजार जगभरातून जावा, अशी दुवा मागण्यात येईल, अशी भावना काझी व्यक्त केली जाता आहे . शासन आणि वैद्यकीय तज्ज्ञांच्या सूचनेनुसार नियमांचे पालन करत रमजानची नमाज घरीच अदा करा, असेही आवाहन त्यांने केले.
महाराष्ट्रात उद्यापासून १५ दिवस कडक संचारबंदी, ऐका मुख्यमंत्री ठाकरेंच्या तोंडून नियमावली, आणि नियोजन #surajyadigital #संचारबंदी #मुख्यमंत्री #ठाकरे #संवाद #गुढीपाडवा #नववर्ष #remadisiver #रेमडीसीवर #सुराज्यडिजिटल #CM #CMOMaharashtrahttps://t.co/jIM4skmrnu
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 14, 2021
मुस्लिम धर्मात रमजानचा महिना अत्यंत पवित्र मानला जातो. मुहम्मद पैगंबर रमजानबाबत म्हणतात की या महिन्यात स्वर्गाची दारं खुली व नरकाची बंद असतात. अर्थात, इस्लामच्या माध्यमातून जीवनातील कर्तव्यपूर्ती करता येते. स्वत:ला अल्लाहपुढे समर्पित करुन त्याच्या आदेशानुसार जगण्याचा मुस्लिम बांधव प्रयत्न करतात. मुसलमान म्हणून असणारी सर्व धार्मिक कर्तव्य पार पाडतात. रमजान महिन्यातील रोजा महिन्यास सुरवात झालीय.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
जगभरातील मुस्लिम बांधवांसाठी फार महत्वाचा आणि खास असणारा, ज्या महिन्याची ते आतुरतेने वाट पाहत तो महिना म्हणजे माहे रमजान. रमजान महिना म्हणजे संयम आणि समर्पण करण्यासह अल्लाहच्या इबादतचा, अल्लाहला आठवण्याचा आणि मागणी करण्याचा महिना. या महिन्यात प्रत्येक मुस्लिम बांधव अल्लाहच्या उपासनेसाठी संपूर्ण तत्परतेने तयार असतो.
राज्यात आज रात्री 8 वाजेपासून 144 कलम लागू, 5 हजार 400 कोटींची अशी मिळणार मदत https://t.co/4obosc3KFr
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 14, 2021
या वर्षात १४ एप्रिल पासून हा महिना सुरू झाला आहे. या महिन्यात पवित्र कुराणचे पठण, नमाज आणि तराबी पठण केली जाते. माहे रमजान हा प्रत्येक मुस्लिम बांधवावर बंधणकारक आहे. तसेच या महिन्यात रोजा ठेवणे देखील खूप महत्वाचे मानले जाते.
मुस्लीम धर्मियांचा पवित्र महिना रमजान होऊ घातला आहे. काल चंद दिसला. आजपासून रोजा सुरु झाला आहे. इस्लामिक कॅलेंडरनुसार नववा महिना रमजान आहे. रमजान महिना मुस्लिम बांधवांसाठी खूप महत्वाचा आहे. हा बरकत, रहमतचा महिना मानला जातो. जगभरातील इस्लामवर विश्वास ठेवणारे लोक रमजानच्या संपूर्ण महिन्यात अल्लाची प्रार्थना करतात, कुराण पढतात, नमाज अदा करतात.
अहमदनगर : सिव्हिल हॉस्पिटलमधील घटना, बेडअभावी गाडीतच दुर्दैवी मृत्यू #surajyadigital #अहमदगर #सुराज्यडिजिटल #civilhospital #सिव्हिल #हॉस्पिटलhttps://t.co/WWq2hwPEfD
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 14, 2021
लोक रमजानच्या चंद्राची डोळे लावून वाट पाहत असतात. चंद्र दिसल्यानंतरच पवित्र महिन्याला आणि रोजाला सुरुवात होते. देशांमध्ये रमजानच्या महिन्याला सुरुवात झालीय. रमजान महिन्यात मुस्लिम बांधव कडक उपवास ठेवतात. सूर्यास्तापासून सूर्यास्तापर्यंत हा उपवास चालतो, याकाळात अल्लाहची प्रार्थना केली जाते.