चेन्नई : IPL 2021 मध्ये आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं हैदराबादचा 6 धावांनी पराभव केला. बंगळुरुनं प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 7 बाद 149 धावा केल्या होत्या. बंगळुरुकडून ग्लेन मॅक्सवेलनं सर्वाधिक 59 धावा केल्या. प्रत्युत्तरात सनरायझर्स हैदराबादचा संघ 20 षटकात 142 धावाच करु शकला. हैदराबादकडून डेव्हिड वॉर्नरनं सर्वाधिक 54 धावा केल्या. तर बंगळुरुकडून शाहबाज अहमदनं 16 व्या षटकात 3 बळी घेत सामना पालटला.
पोलिसाने पत्नीला जाळून मारण्याचा केला प्रयत्न, भाजलेल्या अवस्थेतही दोन दिवस बंदिस्त https://t.co/fwWy6sO6nK
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 15, 2021
शाहबाज अहमदच्या एकाच ओव्हरमध्ये सनरायझर्स हैदराबादच्या दिशेनं असलेली मॅच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या पारड्यात गेली.
पहिल्या मॅचचा हिरो असलेल्या हर्षल पटेलनं शेवटच्या ओव्हरमध्ये दबावात चांगली बॉलिंग केली. त्यामुळे बंगळुरुनं थरारक लढतीत हैदराबादचा पराभव केला.
प्रथम फलंदाजी करताना बेंगलोर संघाने २० ओव्हरमध्ये ८ बाद १४९ धावा केल्या. बेंगलोरकडून ग्लेन मॅक्सवेलने धमाकेदार खेळी करत ५९ धावा केल्या. मात्र संघातील इतर सहकाऱ्यांकडून त्याला अपेक्षित साथ मिळाली नाही. मॅक्सवेलनंतर कर्णधार विराटने सर्वाधिक ३३ धावा केल्या.
हैदराबाद संघाकडून जेसन होल्डरने सर्वाधिक ४ बळी घेत बंगळुरु संघाचे अगदी कंबरडे मोडले. त्याला रशीद खान, भुवनेश्वर आणि टी नटराजन यांनी सुरेख साथ दिली.
मे महिन्यात 'या' तारखेनंतर राज्यातील सत्तेला सुरुंग – चंद्रकांत पाटील https://t.co/DCgc1TpVZc
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 15, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
बंगळुरूच्या मोहम्मद सिराज, शाहबाज अहमद आणि हर्षल पटेल या गोलंदाजांनी केलेल्या भेदक गोलंदाजीमुळे हैदराबादला २० षटकात ९ बाद १४३ धावांपर्यंत मजल मारता आली.
शेवटच्या ४ षटकात ३५ धावांची गरज असताना हैदराबादने जॉनी बेअरस्टो, मनीष पांडे आणि अब्दुल समद या तीन फलंदाजांना शाहबाज अहमदच्या एकाच षटकात गमावले.
संचारबंदी लागू अनेक रस्त्यांवर शुकशुकाट, सोलापुरात अशी आहे नियमावली https://t.co/YhvxUD1kPF
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 15, 2021
ग्लेन मॅक्सवेलचं अर्धशतक हे आरसीबीच्या इनिंगचं वैशिष्ट्य ठरलं. मॅक्सवेलनं फोर आणि ३ सिक्सच्या मदतीनं ५९ रन काढले.बंगळुरूकडून अर्धशतक ठोकलेल्या मॅक्सवेलला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
* विराटने खूर्चीवर काढला राग
विराट कोहली आपल्या आक्रमक स्वभावासाठी ओळखला जातो. चेन्नईच्या मैदानावर सुरु असलेल्या सामन्यात आरसीबीचा कर्णधार पुन्हा एकदा आक्रमक दिसला. विकेट गमावल्यानंतर जेव्हा तो डगआऊटला पोहोचला तेव्हा त्याने त्याचा राग खुर्चीवर काढला.
Think @imVkohli is a bit cross #IPL2021 pic.twitter.com/nzEtxry6ic
— simon hughes (@theanalyst) April 14, 2021
आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वातील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने बुधवारी सनरायजर्स हैदराबादचा पराभव केला. मात्र याच सामन्यात विराट कोहलीचा राग नियंत्रणाबाहेर गेल्याचे दिसून आले. विराट 29 चेंडूत 33 धावा काढून बाद झाला. मात्र यामुळे तो फारच संतापला. तंबूत परत आल्यानंतर विराटने खूर्चीवर राग काढला. बॅट खूर्चीला मारली. याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.