बेळगाव : आजची शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना राहिली नाही, असे देवेंद्र फडणवीस बेळगावात म्हणाले. येथे मराठी माणसासाठी येताय, मुंबईत मराठी माणसाला बेड मिळत नाहीत. काही लोक जिंकण्यासाठी नाही, हरवण्यासाठी उभे आहेत. इतके वर्षे संघर्ष करत होते ते कुठेच दिसत नाही. नवीन लोकं मते खाण्यासाठी उभे आहेत. संजय राऊत हे महाराष्ट्र समितीच्या खांद्यावर बंदूक ठेवून काँग्रेसला मदत करण्यासाठी आले, असेही ते म्हणाले.
बेळगाव लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या प्रचारसभेनंतर आता मतदारसंघात शिवसेना विरुद्ध भाजप, असा तुफान सामना रंगण्याची शक्यता आहे. संजय राऊत यांनी काल (१४ एप्रिल) आपल्या प्रचारसभेत तुफान फटकेबाजी केलेली पाहायला मिळाली. यावेळी त्यांनी भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना तुम्ही बेळगावात मराठी माणसाला पाडण्यासाठी भाजपच्यावतीने सभा घेणार आहात का, असा सवाल विचारला.
'आई म्हणायची, भांडी वाजवू नको दारिद्र्य येतं, मोदींनी ताटं वाजवायला लावली' https://t.co/ayjDZ9MafA
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 15, 2021
बेळगाव लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या प्रचारसभेनंतर आता मतदारसंघात शिवसेना विरुद्ध भाजप, असा तुफान सामना रंगण्याची शक्यता आहे. संजय राऊत यांनी काल (१४ एप्रिल) आपल्या प्रचारसभेत तुफान फटकेबाजी केलेली पाहायला मिळाली. यावेळी त्यांनी भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना तुम्ही बेळगावात मराठी माणसाला पाडण्यासाठी भाजपच्यावतीने सभा घेणार आहात का, असा सवाल विचारला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मात्र, उद्या बेळगावात पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचाराला आले तरी शुभम शेळके यांचा भरधाव घोडा थांबणार नाही. आईची मुलापासून ताटातूट करण्यासाठी भाजप आणखी काय करणार? शुभमचा विजय हा संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांना दिलेली भेट असेल. बेळगावची जनता साद घालेल तेव्हा महाराष्ट्र कायम पाठिशी उभा राहील, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
…तर, पेट्रोल मिळणार नाही, विजय वडेट्टीवारांचे संकेत https://t.co/GOCpTlzwa2
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 15, 2021
दरम्यान, महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांच्या प्रचारासाठी शिवसेना नेते बेळगावात गेले आहेत. त्यांच्या पाठोपाठ आता राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकरही बेळगावात पोहोचल्या आहेत. पंढरपूर येथे भगीरथ भालके यांचा प्रचार केल्यानंतर बेळगावात शिवसेनेच्या साथीला राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकर पोहोचल्या आहेत. मात्र महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आता चक्क महाराष्ट्र एकीकरण समिती आणि काँग्रेस विरोधात प्रचार करणार आहेत.
ही भाषा बरोबर नाही, अजित पवारांवर एम फिल कराव लागेल #surajyadigital #political #सुराज्यडिजिटल #bjp #ncp #पंढरपूर #निवडणूकhttps://t.co/v9nExInoWW
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 15, 2021
देवेंद्र फडणवीस बेळगावात प्रचारासाठी दाखल झाले आहेत. फडणवीस भाजप उमेदवार मंगला अंगडी यांचा करणार प्रचार करणार आहेत. हिंडीलगा येथे देवेंद्र फडणवीस जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीप्रमाणे शनिवारी ( ता.17) मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. भाजप, काँग्रेस आणि महाराष्ट्र एकीकरण समिती अशी होत आहे तिरंगी लढत हाये. शुभम शेळके हे महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार आहेत आणि त्यांच्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी या महाराष्ट्रातील पक्षांनी प्रचार केला आहे.