मुंबई : अखेर केंद्र सरकारने हाफकिनला भारत बायोटेककडून तंत्रज्ञान हस्तांतरण पद्धतीने कोव्हॅक्सिन बनवण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रासाठी मुंबईतच मोठ्या प्रमाणात कोरोनावरील प्रभावी कोव्हॅक्सिन या लशीचे उत्पादन होणार आहे. तसेच कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी याची मोठी मदत होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या परवानगीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.
बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना विरुद्ध भाजप, पंढरपूरबरोबर शनिवारीच होणार मतदान https://t.co/WUgtKGf0Wy
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 15, 2021
हाफकिन संस्थेस भारत बायोटेककडून तंत्रज्ञान हस्तांतरण पद्धतीने कोवॅक्सीन बनविण्यास केंद्र शासनाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने मान्यता दिली आहे. आपल्या विनंतीचा स्वीकार करून केंद्र शासनाने हि परवानगी दिल्याने महारष्ट्रात मोठ्या प्रमाणावर लस उत्पादन सुरु होऊ शकते असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे सचिव रेणू स्वरूप यांनी आज मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, यासंदर्भात वैज्ञानिक तज्ञांच्या समितीने केलेल्या शिफारशीनुसार हि मान्यता देण्यात आली असून कोवॅक्सीन बनविण्यास १ वर्षांचा कालावधी दिला आहे.
आयपीएल रोमांचक सामन्यात राजस्थान रॉयल्स विजयी https://t.co/gCuORLQT2a
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 16, 2021
सध्याचा वाढता संसर्ग आणि लसीकरणाची मागणी पाहता लवकरात लवकर हाफकिन बायो फार्मा कॉर्पोरेशन यांनी उत्पादन सुरु करावे तसेच हाफकिन मध्ये यादृष्टीने लसीसंदर्भात आवश्यक त्या अनुभवी व प्रशिक्षित तंत्रज्ञांची नियुक्ती व्हावी. यासंदर्भात या प्रकल्पावर नियमित देखरेख करण्यासाठी व वेळेत उत्पादन पूर्ण करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यास देखील मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना सांगितले.