नवी दिल्ली : रेल्वे स्टेशनच्या परिसरात आणि रेल्वेत विनामास्क कुणी फिरताना आढळल्यास त्यांच्याकडून 500 रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. कोरोना रुग्ण वाढत असल्याने रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. पुढील 6 महिने हा आदेश कायम राहणार आहे. देशात सलग तिसऱ्या दिवशी 2 लाखांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळल्याने चिंता वाढली आहे. त्यामुळे असे कडक निर्णय आता घेतले जात आहेत.
प्रशासनाची आकडेवारी फसवी, भाजप प्रशासित राज्यातून भयावह सत्यhttps://t.co/reOn6filQU
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 17, 2021
कोरोना विषाणूच्या फैलावामुळे सध्या देशात चिंताजनक परिस्थिती निर्माण झालेली आहे. कोरोनाचा फैलाव होत असताना दिलासादायक बाब म्हणजे सरकारने रेल्वे प्रवासावर निर्बंध आणलेले नाहीत. मात्र रेल्वेमधून प्रवास करताना प्रवाशांना आता कोरोनाबाबतच्या कडक निर्बंधांचे पालन करावे लागणार आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
कोरोनाच्या साधीमुळे स्वच्छतेचे निकष पाळण्यासाठी रेल्वेने प्रवासात मिळणाऱ्या भोजनाची सुविधा बंद केली होती. तसेच रेडी टू इट भोजन सुरू केले होते. तसेच मास्क, सॅनिटायझर, ग्लव्हज आदी वस्तू रेल्वे स्टेशनवरील स्टॉलवर विक्रीसाठी उपलब्ध केले गेले आहेत.
रेल्वेचे 57 आयसोलेशन कोच सोलापुरात दाखल, 513 रुग्णांची व्यवस्था होणार https://t.co/NB8d4WjlD6
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 17, 2021
रेल्वे प्रवासादरम्यान मास्क वापरणे आता अनिवार्य करण्यात आले असून, मास्कचा वापर न केल्यास कडक कारवाई करून संबंधितांकडून ५०० रुपये दंड वसूल करण्यात येईल, असा इशारा रेल्वे प्रशासनाने दिला आहे. रेल्वे प्रवासादरम्यान मास्क वापरण्याचा हा नियम सहा महिन्यांच्या कालावधीसाठी लागू करण्यात आला आहे. तसेच वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने काही अन्य नियमही लागू केले आहेत.
पद्मश्रीप्राप्त, प्रसिद्ध तमिळ अभिनेते विवेक यांचे निधन
https://t.co/Ywp0y4Qr4r— Surajya Digital (@SurajyaDigital) April 17, 2021
* सध्या अशा रेल्वेसेवा सुरू
सध्या रेल्वे एकूण १४०२ स्पेशल ट्रेन चालवत आहे. एकूण ५३८१ उपनगरीय लोकल आणि ८३० पँसेंजर ट्रेन भारतीय रेल्वेकडून चालवल्या जात आहेत. त्याशिवाय २८ स्पेशल क्लोन ट्रेन पण चालवल्या जात आहेत.