अहमदनगर : आमदार निलेश लंके यांनी दुसऱ्यांदा शरद पवारांच्या नावाने कोविड सेंटर सुरू केलं आहे. पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे 1 हजार 100 खाटांचं कोविड सेंटर सुरु केलं आहे. यात शंभर ऑक्सिजन बेड आहेत. यापूर्वी त्यांनी टाकळी ढाकेश्वर इथं 1000 बेडचे कोविड सेंटर सुरु केलं होत. त्यात नाश्ता, जेवणासोबतच करमणुकीच्या साधनांचीही व्यवस्था करण्यात आली होती. या केंद्रांसाठी मोठ्या प्रमाणात मदतीचा ओघ सुरू आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधींचा मोठा निर्णय https://t.co/v2QWqTIAzZ
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 18, 2021
राज्यातील आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणावर ताण आलाय. आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. कोरोना रुग्णांच्या सोयीसाठी कोविड सेंटर उभारली जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे पारनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश लंके यांनी शरद पवारांच्या नावाने उभारले 1 हजार बेडचं कोविड सेंटर दुसऱ्यांदा उभारलं आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
अहमदनगरला आमदार निलेश लंके यांनी दुसऱ्यांदा शरद पवारांच्या नावाने कोविड सेंटर सुरू केलंय. पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे तब्बल 1 हजार 100 खाटांच हे कोविड सेंटर उभारण्यात आलं आहे. यामध्ये शंभर ऑक्सिजन बेड आहेत. विशेष म्हणजे या कोरोना उपचार केंद्रासाठी मोठ्या प्रमाणात मदतीचा ओघ सुरू आहे.
कोविड सेंटरसाठी @LankeMla यांनी नागरिकांना अन्नदान व विविध सुविधांसाठी मदत करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला मोठा प्रतिसाद देत तालुक्यातून १७ लाख रुपये रोख स्वरूपात जमा झालेत. मुंगशी गावाकडून ५ टन धान्य व ५० हजार रुपयांची मदत करण्यात आली आहे.
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) April 17, 2021
आमदार निलेश लंके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाने यापूर्वी पारनेरमधील टाकळी ढाकेश्वर इथं 1000 बेडचे सुसज्ज कोव्हिड सेंटर उभे केले होते. त्यामध्ये कोरोना रुग्णांसाठी पौष्टिक नाश्ता आणि जेवणासोबतच करमणुकीच्या साधनांचीही व्यवस्था करण्यात आलेली. त्या सेंटरमध्ये खास रुग्णांसाठी प्रोजेक्टर, मोबाईल गेम आणि कॅरम बोर्ड अशा अनेक गोष्टींची व्यवस्था करण्यात आली होती. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते (17 ऑगस्ट) त्याचे उद्घाटन करण्यात आले होते.
सोलापुरातून पुरवला जातोय रेमडेसिवीरसाठी कच्चा माल https://t.co/oDbk44neXB
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 18, 2021