पुणे : देशात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे. मात्र, पुण्याच्या बारामती तालुका पोलिसांनी बनावट रेमडेसिवीर तयार करून विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. आरोपी हे रेमडेसिवीरच्या रिकाम्या बाटलीत पॅरासिटामोलच्या गोळ्यांचे द्रावण भरून एक इंजेक्शन 35 हजार रुपयांना विकायचे. याप्रकरणी आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. बारामती पोलिसांनी यातील चार आरोपींना अटक केली आहे.
भाजप राज्य सरकारला 50 हजार रेमडेसिवर देणार भेट, त्या कंपनीच्या मालकाला घेतले ताब्यात #surajyadigital #भाजप #bjp #रेमडेसिवर #remdesiver #company #कंपनी pic.twitter.com/nImIHn9cX3
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 18, 2021
बारामती तालुका पोलिसांनी बनावट रेमडेसिवीर तयार करून त्याची चढ्या दराने विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केलाय. रेमडेसिवीरच्या रिकाम्या बाटलीत पॅरासिटामोलच्या गोळ्यांचे द्रावण भरून एक इंजेक्शन 35 हजार रुपयांना विक्री करून मालामाल होण्याच्या या टोळीचा डाव पोलिसांनी उधळून लावलाय.
गलिच्छ पातळीवर राजकारण होत असेल, तर हे फारच गंभीर आहे. झालेली घटना योग्य नाही आणि ती कायद्यानुसार नाही – फडणवीसhttps://t.co/ZtxRmZO2zu
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 18, 2021
पोलीस पथकाने सापळा रचत पोलिसांनी बारामती शहरातील फलटण चौकात दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून आणखी माहिती घेतल्यास चौघांची टोळी या कामात सक्रिय असल्याची बाब समोर आलीय.
आता कुंभमेळा प्रतिकात्मक असावा – पंतप्रधान मोदी https://t.co/f4j3QGUIhJ
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 17, 2021
इंजेक्शन विक्रीसाठी आलेल्या प्रशांत सिद्धेश्वर घरत (रा. भवानीनगर, ता. इंदापूर) आणि शंकर दादा भिसे (रा. काटेवाडी, ता. बारामती) या दोघांनी मुख्य सूत्रधार दिलीप ज्ञानदेव गायकवाड (रा. काटेवाडी, ता. बारामती) आणि संदीप संजय गायकवाड (रा. भिगवण, ता. इंदापूर) यांच्या सहकार्याने हे इंजेक्शन विक्री करत असल्याची कबुली पोलिसांना दिली. यातील प्रशांत घरत आणि शंकर भिसे हे दोघे इंजेक्शन विक्री करत. तर विमा सल्लागार असलेला दिलीप गायकवाड हा या प्रकरणात मास्टरमाईंड म्हणून काम करत होता.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
बारामतीसह परिसरातील विविध रुग्णालयात काम करणारा संदीप गायकवाड हा रेमडेसिवीरच्या रिकाम्या बाटल्या आणि पॅकींग पुरवण्याचे काम करत होता. एका इंजेक्शनला 35 हजार रुपये एवढी किंमत ही टोळी वसूल करत होती. त्यांच्यावर भादंवि कलम 420/34, औषधे आणि सौंदर्य प्रसाधने कायदा, औषध किंमत अधिनियम यातील विविध कलामांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आलेत. बारामती शहरातील फलटण चौकात दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून आणखी माहिती घेतल्यास चौघांची टोळी या कामात सक्रिय असल्याची बाब समोर आलीय.
आज आरटीजीएस सेवा 14 तासांसाठी बंद, पैसे पाठवू शकणार नाही #RTGS #आरटीजीएस #stop #surajyadigital #सुराज्यडिजिटल pic.twitter.com/U8Tq1xMw3j
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 18, 2021
या टोळीने अनेकांना हे इंजेक्शन विकल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय. त्यानुसार या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात करण्यात आलीय. अन्न व औषध विभागानेही या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केलीय. त्यामुळे यात आणखी कोणते आरोपी निष्पन्न होतात आणि त्यांनी कुणाकुणाला या इंजेक्शनची विक्री केली हे लवकरच समोर येणार आहे.
रायपूर : हॉस्पिटलला भीषण आग, पाचजण दगावले, अॉक्सिजनअभावी चौघांचा दुर्दैवी मृत्यू #oxygen #fires #raypur #surajyadigital #रायपूर #सुराज्यडिजिटल #5death pic.twitter.com/Tpy6o4kuaZ
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 18, 2021
देशासह राज्यात सध्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झालाय. या पार्श्वभूमीवर बनावट इंजेक्शनची विक्री होत असल्याची बाब उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निदर्शनास आली होती. त्यांनी याबाबत तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार बारामती तालुका पोलिसांना काहीजण या इंजेक्शनची विक्री करत असल्याची माहिती मिळाली.