टेंभुर्णी : तुम्ही बांधलेले अपार्टमेंट बेकायदेशीर असून या प्रकरणी मी तक्रार केलेली आहे तुम्ही मला दोन लाख रुपये द्या मी तक्रार मागे घेईन, जर पैसे नाही दिले तर एका महिलेने दिलेल्या तक्रारीवरून तुमची बदनामी करेन असे म्हणत दोन लाखाची खंडणी मागितल्याचा प्रकार टेंभुर्णीत घडला. ट्रस्टच्या नावाखाली खंडणी स्वरूपात करोडो रूपये गोळा केल्याप्रकरणी टेंभुर्णी येथील सामाजिक कार्यकर्ते बशीर जागीरदार यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
हफ्ते गृहमंत्र्यांना पोहचवावे लागतात, पाच लाखांची पीआयने केली मागणी https://t.co/2bT8SoWvVy
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 19, 2021
शिवसेना नेते संजय कोकाटे यांनी दिलेल्या तक्रारीवरून दोन लाख रुपयाची खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे टेंभुर्णी आणि माढा तालुक्यात खळबळ माजली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, येथील शिवसेना नेते संजय शिवलाल कोकाटे यांचे सोलापूर – पुणे महामार्गालगत चार मजली व्यापारी व निवासी अपार्टमेंट २०१७ मध्ये बांधले आहे. सदर बांधकाम बेकायदेशीर असून नगररचना विभागाचा नकाशा व बांधकाम परवाना नसताना बेकायदेशीरपणे ग्रामपंचायत कार्यालयात नोंद लावून घेतली. अशी तक्रार २० डिसेंबर २०१७ रोजी नगर रचना विभाग (सोलापूर ) येथे बशीर जहागीरदार यांनी केली होती.
टेंभुर्णी तील मंडल अधिकारी यांचे १६ एप्रिल २०२१ रोजी जहागीरदार यांनी म्हणणे सादर केले होते. ही तक्रार मागे घेण्यासाठी बशीर जहागीरदार यांनी २८ मार्च रोजी कोकाटे यांच्या घरी जाऊन तुम्ही मला २ लाख रूपये दिले तर मी तक्रार माघारी घेतो, असे सांगितले. यावर कोकाटे मी पैसे देणार नसल्याचे सांगितले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
त्यानंतर१८ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजण्याचा सुमारास कोकाटे पेट्रोल पंपाकडे निघाले असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानासमोर पेट्रोल पंपाकडे निघालेल्या कोकाटे यांना थांबवून २ लाख रूपये दे नाहीतर तुला प्रकरणाचा त्रास होईल. तुझ्यावर केसेस दाखल करून तुझी बदनामी करण्याची धमकी दिली. जहागीरदार यांनी शिवीगाळ केली नाहीतर मी तुला वेगवेगळ्या प्रकारचा त्रास देईन व तुझी बदनामी करेन असे म्हटले.
दिलासादायक! वर्ध्यात सुरु होणार रेमडेसिव्हीरचे उत्पादन https://t.co/C2uajCzCaa
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 19, 2021
यावर कोकाटे म्हणाले की, मी तुझ्या विरुद्ध पोलीसामध्ये तक्रार करेन.यावर जहागीरदार म्हणाला की, मी या बाबत अगोदरच पोलीसामध्ये वरिष्ठ अधिका-याकडे अर्ज देवून ठेवलेला आहे,मी माहिती अधिकार कार्यकर्ता असल्याने पोलीस माझे काही करु शकत नाहीत,असे म्हणुन मला दमदाटी केली. शिवीगाळही केली.
कोरोना रुग्णांची माहिती लपवणा-या दोन खासगी डॉक्टरांवर गुन्हा दाखल https://t.co/EkbPl8zjsZ
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 19, 2021
यावेळी कोकाटे सोबत अमर पवार, विलास डोके , विजय पवार, तुकाराम गायकवाड या व्यक्ती होत्या. त्यावेळी कोकाटे म्हणाले की, शिव्या का देता तेंव्हा तो मला म्हणाला की,तु कोणाकडे तक्रार करायची तिकडे कर असे जहागीरदार यांनी दमबाजी केल्याची कोकाटे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
जहागीरदार यांची ट्रस्ट ट्रस्ट असून त्यांनी या ट्रस्टच्या नावाने प्रत्यक्षात घेतली रक्कम आणि त्यांना दिलेल्या पावत्या यामध्ये फरक असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. काही जणांना हजार रुपयाच्या रखमा घेऊन पावत्या दिल्या नाहीत.
* पावती आणि रक्कमेत तफावत
बशीर जागीरदार यांनी स्थापन केलेल्या ट्रस्ट च्या माध्यमातून देणगी स्वरूपात करोडो रुपये जमा केल्याची तक्रार कोकाटे यांनी दिली असून यामध्ये नागरिकांकडून घेतलेली रक्कम आणि त्यांना दिलेल्या पावत्या यात तफावत असल्याचेही म्हटले आहे.
मी माझ्या नवऱ्याला किस करेल, तुम्ही रोखणार का ? कर्फ्यूदरम्यान घडला प्रकार, पहा व्हायरल व्हिडिओ https://t.co/bsmGqOvrRe
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 19, 2021
खालील लोकांकडून धनाजी कदम यांच्याकडून 25,000/-रुपये घेवुन त्यास 5000/-ची पावती दिली आहे तसेच विशाल कांबळे याचे कडुन देखील 25000/-रुपये घेवुन त्यास 5000/रुपयाची पावती दिली आहे व इंद्राम उर्फ इंद्रजित वामन काळे याचे कडुन 40000/-रुपये घेवुन त्यास 11,000/-रुपयाची पावती दिली व पप्पु उर्फ समाधान काळे याचे कडुन 21,000/-रुपये घेवुन त्यास पावती दिली नाही तसेच सविता सतिश भोसले यांचेकडुन देखील दमदाटी करुन 21,000/-रुपये घेवुन पावती दिली नाही त्याच प्रमाणे नितिन अनिल पाटील ,दत्तात्रय किसन कवडे, नितिन उर्फ सोनु महाडिक,गणेश मस्के,राहुल खटके,कृष्णा गायकवाड ,संजय खटके अशा अनेक लोकाकडून जागीरदारने पैसे मागून कोट्यावधी रुपये जमा केले आहेत.यावरून टेंभुर्णी पोलीस ठाण्यात संशयित आरोपी बशीर जहागिरदार यांचे विरुद्ध कलम 384 व 504 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.