नागपूर / मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा एकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका होत आहे. यावेळी निमित्त ठरला आहे त्यांचा पुतण्या तन्मय फडणवीस. नुकताच तन्मयचा कोरोना लस घेतानाचा फोटो व्हायरल झाला आहे. मात्र सध्या फक्त 45 वर्षांवरील नागरिकांनाच लस घेण्याची परवानगी आहे. असे असताना तन्मयला आधीच लस कशी मिळाली? असा सवाल विचारला जात आहे. तन्मय हा माजी मंत्री शोभा फडणवीस यांचा नातू आहे.
#IPL2021 आयपीएल – आज मुंबईविरुद्ध दिल्ली #Delhi #surajyadigital #Mumbai #सुराज्यडिजिटल #आयपीएल pic.twitter.com/yzNSM802qa
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 20, 2021
राज्यात एकीकडे करोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असताना, दुसरीकडे लशींचा तुटवडाही निर्माण झाल्याचे चित्र आहे. अशात विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांचा पुतण्या तन्मय फडणवीस याने लस घेतल्यावरून सोशल मिडियावर निशाणा साधला जात आहे. संपूर्ण देशात सध्या ४५ वर्षांवरील व्यक्तींना लस दिली जात असताना ४५ वर्षांपेक्षा कमी वय असलेला तन्मय फडणवीस लस घेतो कसा, असा सवाल लोक विचारू लागले आहेत. तन्मय फडणवीस याने दुसऱ्यांदा लस घेतली आहे.
रेमडेसिव्हिरचा साठाच मिळाला नाही, फक्त भाजपने आवाहन केल्याने ही स्टोरी रचून राज्य सरकारने कारवाई केली, कोणत्याही कारवाईला घाबरत नाही #devendrafadanvis #remedisever #bjp #रेमडेसिव्हिर#surajydigital #सुराज्यडिजाटलhttps://t.co/S81Vt4NOW8
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 20, 2021
येत्या एक मेपासून देशातील 18 वर्षांवरील सर्वांना कोरोनाची लस घेण्याची मुभा मिळाली आहे. परंतु विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या तरुण पुतण्याने आधीच लस घेतल्यामुळे सोशल मीडियावर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. देवेंद्र फडणवीस यांचे पुतणे आणि माजी मंत्री शोभा फडणवीस यांचे नातू तन्मय फडणवीस लस घेतानाचे फोटो व्हायरल झाल्यामुळे टीकेची झोड उठली आहे.
"Chacha Vidhayak Hain Humare" pic.twitter.com/0qMR5cCiyp
— Nimo Tai (@Cryptic_Miind) April 19, 2021
रेमडेसिव्हीरच्या मुद्द्यावरुन राजकारण तापलं असतानाच आता देवेंद्र फडणवीस यांच्यावर काँग्रेसने हल्लाबोल चढवला आहे. देवेंद्र फडणवीस यांचे पुतणे तन्मय फडणवीस यांनी लस घेतानाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्यांनी तो काही वेळात डिलीटही केला. मात्र त्याआधी त्याचे स्क्रीनशॉट व्हायरल झाले. तन्मय यांचे वय 45 वर्षांपेक्षा अधिक नाही, ते फ्रंटलाईन वर्कर नाहीत, मग त्यांना कोरोनाची लस कशी मिळाली, असा प्रश्न सोशल मीडियावर विचारला जात आहे. चाचा विधायक है हमारे या प्रसिद्ध विनोदी सीरीजच्या नावावरुनही काही जणांनी टीका केली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
“45 वर्षांवरील लोकांनाच लस देण्याची अट मोदी सरकारने घातली आहे. असं असताना फडणवीसांच्या 45 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या पुतण्याला लस मिळतेच कशी? भाजप नेत्यांच्या कुटुंबीयांचा जीव महत्त्वाचा मग इतर लोक काय कीडे मुंग्या आहेत का? त्यांच्या जीवाची काहीच किंमत नाही का!” असा सवाल काँग्रेसच्या ट्विटर अकाऊण्टवरुन करण्यात आला आहे.
४५ वर्षांवरील लोकांनाच लस देण्याची अट मोदी सरकारने घातलीये. असं असताना फडणवीसांच्या ४५ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या पुतण्याला लस मिळतेच कशी?
भाजप नेत्यांच्या कुटुंबीयांचा जीव महत्त्वाचा मग इतर लोक काय किडेमुंग्या आहेत का? त्यांच्या जिवाची काहीच किंमत नाही का! pic.twitter.com/oN49h5xiiC
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) April 19, 2021
“तन्मय फडणवीस 45 वर्षांपेक्षा मोठा आहे का? फ्रंटलाईन वर्कर आहे का? आरोग्य कर्मचारी आहे का? भाजपकडे रेमडेसिव्हीरप्रमाणे लसींचाही गुप्त साठा आहे का?” असे प्रश्न काँग्रेसने उपस्थित केले आहेत. आता जनतेच्या प्रश्नावर फडणवीस मौन सोडणार का, हा सवाल विचारला जात आहे.
Hey @KanganaTeam,
Tanmay Fadnavis got Vaccinated even though he is an Actor and below 45 years!
Is this NEPOTISM or not? Is Tanmay not part of BOLLYWOOD MAFIA?
Will you meet Governor and Modiji to complain about Fadnavis? pic.twitter.com/4J38hOKisY
— Srivatsa (@srivatsayb) April 19, 2021
तन्मय हा कलाकार आहे आणि त्याचे वय ४५ वर्षांपेक्षा कमी असतानाही त्याने लस घेतली, असे म्हणत ही वशिलेवाजी नाही का, असा सवाल या नेटकऱ्याने विचारला आहे. तन्मय हा बॉलिवूड माफियांचाच एक भाग नाही का?… मग आता फडणवीस यांची तक्रार करण्यासाठी तुम्ही राज्यपाल आणि पंतप्रधानांची भेट घेणार का?, असे एकावर एक प्रश्नही त्याने विचारले आहेत.
* तन्मय फडणवीसची अशी आहे ओळख
– विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे पुतणे
– तन्मय हा माजी मंत्री शोभा फडणवीस यांचा नातू आहे.
– अभिनेता असल्याचा ट्विटरवर उल्लेख
– नागपुरातील पब्लिक फिगर असे इन्स्टाग्राम बायोमध्ये मेन्शन
तन्मय फडणवीस माझा दूरचा नातेवाईक, देवेंद्र फडणवीसांनी केले हात वर https://t.co/FaFXMkPFLv
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 20, 2021