सोलापूर / बार्शी : सोलापुरातील सराफाने पोलीस निरीक्षक संतोष गिरी गोसावी यांच्यावर केलेल्या आरोपाने खळबळ माजली आहे. गृहमंत्र्यांच्या नावाने बार्शी पोलिसांनी आपल्याकडे पाच लाख रुपयांची मागणी केली, असा धक्कादायक आरोप सराफ व्यावसायिक अमृतराव गुगळे यांनी केला आहे. मात्र पोलिसांनी सराफ व्यावसायिकाचे सर्व आरोप फेटाळले आहेत.
बाहेरील राज्यातून येणा-यासाठी RTPCR निगेटिव्ह रिपोर्ट बंधनकारक https://t.co/OLtqhaYFCn
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 19, 2021
येथील हळद गल्ली मध्ये असलेले चांदमल ज्वेलर्स या सराफी दुकानाचे शटर उघडून पोलिसांनी आत बसलेल्या दुकानमालक अमृतलाल चांदमल गुगळे यांना पोलिस ठाण्यात नेवून त्यांच्यावर कोरोना प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन केल्याबाबतचा गुन्हा दाखल करुन दुकान सील केले. दरम्यान ही कारवाई टाळण्यासाठी पो.नि. संतोष गिरीगोसावी यांनी पाच लाख रुपये मागितले, असा अरोप गुगळे यांनी केला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रात कडक निर्बंध लागू आहेत. तरीपण सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील अमृतराव गुगळे या सराफ व्यावसायिकाने चांदमल ज्वेलर्स हे आपलं सोन्याचं दुकान सुरु ठेवलं होतं. राज्य सरकार आणि सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी बार्शी शहर पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन त्यांचं दुकान सील केलं.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
बार्शी शहरचे पोलीस निरीक्षक संतोष गिरी गोसावी यांनी आपल्याकडे तब्बल 5 लाख रुपयांची मागणी केली. ते देण्यास नकार दिल्याने दुकान सील केल्याचा आरोप सराफ व्यापारी अमृतराव गुगळे यांनी केला आहे. हे सर्व हप्ते गृह मंत्रालयापर्यंत पोहोचवावे लागतात, असंही पोलीस निरीक्षक संतोष गिरी गोसावींनी म्हटल्याचा आरोप सराफ व्यावसायिकाने केला आहे. अमृता अमृतराव गुगळे यांनी सराफ दुकान उघडून कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमृतराव गुगळे यांचे सराफ दुकान चालू असल्याची माहिती आम्हाला मिळाल्यानंतर आम्ही कारवाई केली, असं स्पष्टीकरण पोलीस निरीक्षकांनी दिलंय.
दिलासादायक! वर्ध्यात सुरु होणार रेमडेसिव्हीरचे उत्पादन https://t.co/C2uajCzCaa
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 19, 2021
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केला होता. मनसुख हिरेन हत्या प्रकरणात नाव आलेले निलंबित API सचिन वाझे यांना अनिल देशमुखांनी महिन्याला 100 कोटी रुपयांच्या वसुलीचं टार्गेट दिलं होतं, असं पत्र परमबीर सिंग यांनी म्हटलं होतं. यानंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं होतं. तसेच या प्रकरणाची अद्यापही चौकशी सुरू आहे.
कोरोना रुग्णवाढीला निवडणुकांसोबत जोडणे योग्य नाही : अमित शहा https://t.co/RKoqcaYvH7
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 19, 2021
* पंधरा दिवसांपूर्वी गुन्हा दाखल
पंधरा दिवसांपूर्वी गुगळे यांच्या दोन पुतण्याविरोधात शहर पोलिस ठाण्यात जबरदस्तीने जागा हडप करण्याबाबत गुन्हा दाखल झालेला आहे. तसेच हा दुसरा गुन्हा दाखल झालेला आहे. त्यामुळे गुगळे पुर्वग्रहदूषित झाले आहेत. त्यांचे आरोप थोतांड आहेत. ते गांभीर्याने घेण्याची गरज नाही. त्यांनी केलेल्या चारित्र्यहननाच्या प्रयत्नांबद्दल कायदेशीर कारवाई केली जाईल, असे एका व्हिडीओव्दारे स्पष्ट केले आहे.