कोरोना संकट; नेट परीक्षा स्थगित https://t.co/CvwaEHLLwz
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 20, 2021
मुंबई : राज्यातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारकडून अखेर आणखी कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार किराणा दुकाने, बेकरी, भाजीपाला, फळविक्री, चिकन-मटण विक्रीची दुकाने सकाळी 7 ते 11 या वेळेतच सुरु ठेवता येणार आहेत. त्यानंतर सर्व लॉकडाऊनच्या नियमानुसार सर्व दुकाने बंद ठेवावी लागतील. आता या निर्णयामुळे व्यापारी वर्गात काय पडसाद उमटणार, हे पाहावे लागेल.
All groceries, vegetable shops, fruit vendors, dairies, bakeries, confectionaries, all type of food shops, shops related to farm produce, pet food shops, shops related to materials for impending rainy season for individuals/orgs to be open only b/w 7 to 11 AM: Maharashtra Govt pic.twitter.com/N14KZl4Rmk
— ANI (@ANI) April 20, 2021
नव्या नियमानुसार किराणा दुकाने सकाळी 7 ते 11 या वेळेतच सुरु राहणार असली तरी होम डिलिव्हरी करण्यासाठी रात्री आठपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहक फोनवरुन संपर्क साधून रात्री आठपर्यंत दुकानातून सामान घरी मागवू शकतात. तसेच नव्या नियमांनुसार रेशनिंगच्या दुकानांवरही 7 ते 11 ची मर्यादा घालून देण्यात आली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
किराणा दुकान, भाजीपाला, फळविक्री, दूध विक्री दुकान (डेअरी), चिकन, मटण, मासे विक्री, खासगी वाहनांसाठी पेट्रोल पंप, कृषी संबंधित सेवा, पशुखाद्याची विक्री करणारी दुकानं सकाळी 7 ते 11 याच वेळेत खुली राहतील. दुकानांना सकाळी 7 ते रात्री 8 यावेळेत होम डिलिव्हरी करता येईल. स्थानिक प्रशासन त्यांच्या वेळांच्या बाबतीत परिस्थिती पाहून निर्णय घेतील.
दहावीच्या परीक्षा रद्द; बारावीच्या परीक्षा होणार https://t.co/Xshdb8a3bn
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 20, 2021
नव्या नियमावलीनुसार धार्मिक स्थळं, आठवडी बाजार, दारुची दुकानं, सर्व खासगी कार्यालये, सलून, ब्यूटी पार्लर, चहाची टपरी, स्टेडियम, मैदाने, सिनेमागृह, नाट्यगृह, कोचिंग क्लासेस पूर्णत: बंद राहतील.
राजपुत्र अमित ठाकरेंना कोरोनाची लागण #surajyadigital #CoronaVirus #maharashtra #covid #महाराष्ट्र #AmitThackeray #MNS #सुराज्यडिजिटल pic.twitter.com/qZZ8uM1lZ9
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 20, 2021