नवी दिल्ली : कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे नेट परीक्षा स्थगित करण्यात आली आहे. ही परीक्षा 2 मे ते 17 मे दरम्यान देशभर होणार होती. परंतु आता ही परीक्षा स्थगित करण्यात आली आहे. तसेच नियोजित तारीख 15 दिवस आधी कळवली जाईल, असे एनटीएने स्पष्ट केले आहे. दरम्यान, नॅशनल टेस्टिंग) एजन्सी (एनटीए) मार्फत देशभरात नेट परीक्षा घेतली जाते. प्राध्यापक होण्यासाठी ही परीक्षा महत्त्वाची असते.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांच्या पत्नी कोरोना पॉझिटिव्ह https://t.co/w9pcOSJvqo
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 20, 2021
नॅशनल ईलिजिबिलिटी टेस्ट म्हणजेच राष्ट्रीय पात्रता परीक्षाही इतर परीक्षांप्रमाणे पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. 2 मे ते17 मे दरम्यान नेटची परीक्षा होणार होती. दरवर्षी नॅशनल टेस्टिंग एजन्सी ( एनटीए ) मार्फत सहायक प्राध्यापक पदासाठी परीक्षा घेतली जाते. मात्र, देशातला आणि राज्यातला वाढता कोरोनाचा संसर्ग पाहता परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी महाराष्ट्रासह देशातील विद्यार्थ्यांनी केली होती.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
दहावीच्या परीक्षा रद्द; बारावीच्या परीक्षा होणार https://t.co/Xshdb8a3bn
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 20, 2021
देशात कोरोना विषाणू संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. बारावीच्या परीक्षा लांबणीवर टाकल्या गेल्या आहेत. नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशनकडून घेतली जाणारी नीट पीजी परीक्षा देखील लांबणीवर टाकली गेली आहे.
राजपुत्र अमित ठाकरेंना कोरोनाची लागण #surajyadigital #CoronaVirus #maharashtra #covid #महाराष्ट्र #AmitThackeray #MNS #सुराज्यडिजिटल pic.twitter.com/qZZ8uM1lZ9
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 20, 2021
वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहता आता राष्ट्रीय पात्रता परीक्षा म्हणजेच नेट परीक्षा देखील लांबणीवर टाकण्यात आली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी ही माहिती दिली आहे. कोरोना विषाणू संसर्ग कमी झाल्यानंतर विद्यार्थ्यांना 15 दिवस अभ्यासाला वेळ मिळेल अशा पद्धतीनं तारीख जाहीर केली जाईल, असं पोखरियाल म्हणाले.
Dear all, I request to you stay safe and follow all necessary precautions for #COVID19.#Unite2FightCorona
— Dr. Ramesh Pokhriyal Nishank ( Modi Ka Parivar) (@DrRPNishank) April 20, 2021
देशभरातील विद्यापीठ तसेच अन्य उच्च शिक्षण संस्थांमध्ये कनिष्ठ संशोधक छात्रवृत्ती आणि सहाय्यक प्राध्यापक पदासाठी विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे नॅशनल ईलिजिबिलिटी टेस्टचे आयोजन केले जाते. ही परीक्षा वर्षातून दोन वेळा जून आणि डिसेंबर महिन्यात घेतली जाते. मात्र, 2020 साली कोरोना महामारीमुळे या परीक्षांचे आयोजन लांबले होते.
अभिनेते किशोर नांदलसकर यांचे कोरोनाने निधन, 'जिस देश में गंगा रहता है' मधील सन्नाटा काळाच्या पडद्याआड https://t.co/ahTcsCoExF
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 20, 2021