मुंबई : मराठी आणि हिंदी अभिनेते किशोर नांदलसकर यांचे निधन झाले आहे. नांदलसकर यांचे आज (मंगळवार) दुपारी कोरोनाने निधन झाले. मागील दोन आठवड्यांपासून ते ठाण्याच्या कोविड सेंटरमध्ये होते. परंतू आज त्यांचे निधन झाले. त्यांनी इना मिना डिका चित्रपटातून आपल्या करियरची सुरूवात केली. नांदलसकर यांनी 30 चित्रपटांत काम केले आहे. जिस देश मे गंगा रहता है, येड्यांची जत्रा, करामती यांसारख्या चित्रपटांत त्यांनी काम केले.
ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांच करोनाने निधन.💐💐
अनेक हिंदी आणि मराठी चित्रपट, मालिका आणि नाटकांमधून उल्लेखनीय कामगिरी.
शेजारी शेजारी, हळद रुसरी कुंकू हसल, पाहुणा, वास्तव, जीस देश मे गंगा रेहता है, सिंघम या त्यांच्या काही गाजलेल्या कलाकृती.#KishorNandlaskar #सन्नाटा pic.twitter.com/gsd2rmDujJ— 💫 गणेश ♐🚩🇮🇳 (@GaneshPandule10) April 20, 2021
ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचं करोनाने निधन झालं. काही दिवसांपूर्वीच त्यांना करोनाची लागण झाली होती. ‘जिस देश में गंगा रहता है’ या गोविंदाच्या सिनेमातील नांदलस्करांचं ‘सन्नाटा’ नावाचं कॅरेक्टर विशेष गाजलं.
स न्ना टा 🙏🏻#kishornandlaskar
भावपूर्ण श्रध्दांजली!!! pic.twitter.com/BgdI93ATsW
— Vaibhav Shetkar (@vaibhavshetkar) April 20, 2021
नांदलस्कर यांनी 40 नाटके, 30 हून अधिक मराठी आणि हिंदी सिनेमे तसेच 20 हून अधिक मालिकांमध्ये काम केले आहे. तर ‘नाना करते प्यार’ हे त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवर केलेलं शेवटचं नाटक होतं.
मराठीतील ज्येष्ठ कलाकार, एक चुरस्त्र अभिनेते हरपला आहे. नांदलस्कर यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर ठाण्यात उपचार सुरु होते.
चतुरस्र जेष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर
भावपूर्ण श्रद्धांजली
🙏#RIP#kishornandlaskar #marathiactor #Bollywood #marathinatak pic.twitter.com/T0giXZGZb3— RAVINDRA R. SAMEL (@ravimakeup) April 20, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मात्र, उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खारेपाटण तालुक्यातील शेजवली हे किशोर नांदलस्कर यांचे मूळ गाव. त्यांचा जन्म मात्र मुंबईतच झाला होता. ‘न्यू इरा हायस्कूल’ आणि ‘युनियन हायस्कूल’ येथे त्यांचं शालेय शिक्षण झाले होते.
कोरोनापेक्षाही भयानक आणि घातक कीड म्हणजे 'राजकारण'
https://t.co/tjMF5NZgGi— Surajya Digital (@SurajyaDigital) April 19, 2021
किशोर नांदलस्कर यांना अभिनयाचा वारसा त्यांचे वडील खंडेराव यांच्याकडून मिळाला होता. त्यांच्यामुळे घरातील वातावरणातच नांदलस्कर यांनाही अभिनयाचं वेड त्यांना लागले होते. नांदलस्कर यांनी आत्तापर्यंत सुमारे ४० नाटके, २५ हून अधिक मराठी व हिंदूी चित्रपट आणि २० हून अधिक मालिकांमधून काम केले होते. ‘नाना करते प्यार’ हे त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवर काम केलेले शेवटचे नाटक. ‘सारे सज्जन’, ‘शेजारी शेजारी’, ‘हळद रुसली कुंकू हसले’ आणि इतर काही चित्रपट त्यांच्या नावावर जमा आहेत.
महेश मांजरेकर यांच्या ‘वास्तव’ चित्रपटातून नांदलस्कर यांचा बॉलीवूडच्या रुपेरी पडद्यावर प्रवेश झाला. ‘जिस देश में गंगा रहता है’ (गोविंदा), ‘तेरा मेरा साथ है’ (अजय देवगण), ‘खाकी’ (अमिताभ बच्चन) यांच्याबरोबर काम करायची संधी त्यांना मिळाली. ‘चाल जाए पर वचन न जाए’, ‘ये तेरा घर ये मेरा घर’, ‘हलचल’, ‘सिंघम’ या हिंदी चित्रपटांतही त्यांची भूमिका होती. नांदलस्कर यांच्या जाण्याने एक जाणता कलाकार हरपल्याची भावना सर्वत्र व्यक्त केली जात आहे.
ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांच करोनाने निधन.💐💐
अनेक हिंदी आणि मराठी चित्रपट, मालिका आणि नाटकांमधून उल्लेखनीय कामगिरी.
शेजारी शेजारी, हळद रुसरी कुंकू हसल, पाहुणा, वास्तव, जीस देश मे गंगा रेहता है, सिंघम या त्यांच्या काही गाजलेल्या कलाकृती.#KishorNandlaskar pic.twitter.com/4MyLCl9UfL— Digvijay Bagal – दिग्विजय बागल (@Digvijay4Youth) April 20, 2021