बीड : नाशिक येथे ऑक्सिजन अभावी तब्बल २२ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर देशभरात खळबळ उडाली. त्यानंतर आता बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे सुद्धा ऑक्सिजन अभावी ६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अर्धा तास ऑक्सिजन पुरवठा खंडित झाल्याने ६ रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला. तर रुग्णालय प्रशासनाने हा आरोप फेटाळून लावला.
भारताकडून 9 हजार 294 मेट्रीक टन अॉक्सिजनची निर्यात #oxygen #india #surajyadigital #सुराज्यडिजिटल #अॉक्सिजन pic.twitter.com/VC45W3Cve1
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 21, 2021
अंबेजोगाईतील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सहा कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याचं वृत्त एका वृत्तवाहिनीने दिलं आहे. रुग्णालयातील दोन आणि तीन या वार्डांमध्ये कोरोनाची गंभीर लक्षणं असलेल्या रुग्णांवर उपचार केले जातात. या वार्डातील ऑक्सिजन पुरवठा अर्धा तास खंडित झाल्याची माहिती रुग्णांच्या नातेवाईकांनी केला.
नाशिकमध्ये ऑक्सिजनअभावी 22 जणांचा मृत्यू, 11 जणांची नोंद https://t.co/r6JDs6ocZv
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 21, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
ऑक्सिजन बंद झाल्यानेच काही रुग्णांचा मृत्यू झाल्याचंही नातेवाईकांनी सांगितलं. अर्धा ते एका तासादरम्यान सहा रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती यासंदर्भात बोलताना रुग्णालयाच्या प्रशासनं दिली. ज्या रुग्णांचे मृत्यू झाले, त्यांना करोनाबरोबर सहव्याधी होत्या आणि रुग्णालयात येतानाच त्यांची प्रकृती गंभीर होती असं म्हटलं आहे.
नाशिक दुर्घटना : मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपये मदत जाहीर, मोदी – शहांसह अनेकांच्या प्रतिक्रिया, चौकशीचे आदेश https://t.co/31AmFVBfk0
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 21, 2021
* मात्र प्रशासनाने आरोप फेटाळला
मागील तीन-चार दिवसांपासून रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा आहे. पण त्याच्यासाठी लातूर, औरंगाबाद, जालना, बीड येथून ऑक्सिजन मागवत आहोत. आजही सकाळपासून लातूरहून ऑक्सिजन सिलेंडर मागवले. आयसीयूजवळ मी स्वतः होतो. वार्ड नंबर तीनजवळही उभा होतो. या घटनेचा पूर्ण अहवाल मी मागवला आहे. अहवाल आल्यानंतर सगळं स्पष्ट होईल, पण ऑक्सिजन मिळाला नाही म्हणून मृत्यू झाल्याचं चूक आहे, असं सांगत स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाचे अधिष्ठाता शिवाजी सुक्रे यांनी नातेवाईकांनी केलेले आरोप फेटाळून लावले आहेत.