टेंभुर्णी : कोरोनाच्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या आपत्ती व्यवस्थापन तथा साथरोग निवारण कायद्याचा भंग करून शहरात विनाकारण मोकाट फिरणाऱ्या नागरिकाची आजपासून कोरोना टेस्ट करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये ५० जणांवर टेंभुर्णी पोलिसांनी ग्रामपंचायत आरोग्य विभागाच्या सहकार्याने कारवाई करीत सर्वांची रॅपिड अँटीजन टेस्ट केली. आता ही टेस्ट दररोज करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री ठाकरेंचा संवाद रद्द, लॉकडाऊनचा निर्णय मुख्य सचिव जाहीर करणार #surajyadigital #ChiefSecretary #लॉकडाऊन #lockdown #सुराज्यडिजिटल #cm #संवाद #cancelled pic.twitter.com/6BVSgPUnQu
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 21, 2021
टेंभुर्णी शहरात कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी लागू केलेल्या आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन करून मोकाट फिरणाऱ्या ५० लोकांवर कारवाई केली. पकडलेल्या सर्वांची कोरोना टेस्ट करण्यात आली. यात एकजण बाधित मिळून आला. त्याची रवानगी थेट कोविड सेंटरमध्ये केली. कोरोना विषाणूने सर्वत्र थैमान घातले असून बाधित रुग्णांना ऑक्सिजन बेड उपलब्ध होत नसल्याने अनेकांना नाहक आपला जीव गमवावा लागत आहे.
#IPL2021 सनरायझर्स हैदराबादचा सूर्योदय, यंदाच्या आयपीएलमधील पहिला विजय https://t.co/wGOR5OA2EE
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 21, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
टेंभुर्णी ग्रामपंचायत व टेंभुर्णी पोलिसांच्या वतीने विविध उपाय योजना करण्यात येत आहे. मात्र मोकाट फिरणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. यामुळे आज बुधवारी ११ वाजता कूर्डूवाडी चौक येथे मोकाट फिरणाऱ्या ५० लोकांना पकडून त्यांची कोरोना टेस्ट केली. यामध्ये एक व्यक्ती कोरोना बाधित आढळुन आला. त्याची रवानगी तातडीने कोरोना सेंटर येथे करण्यात आली.
नाशिक दुर्घटना : निष्काळजीपणाने अजून किती बळी घेणार आहात?, सखोल चौकशीची मागणी https://t.co/NoZuqHkkF6
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 21, 2021
यावेळी पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे, सरपंच प्रमोद कुटे, पी आय प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. अमोल माने, प्रयोगशाळा तंत्रज्ञ नितीन हिलाले,ग्रामविस्तार अधिकारी मधुकर माने,गणेश केचे, सोमनाथ साळुंके,अमोल धोत्रे, शैलेश ओहोळ, एएसआय अभिमान गुटाळ,पोकॉ.खंडागळे, गणेश बैरागी, किशोर घेचंद उपस्थित होते.