मुंबई : नाशिकमधील रुग्णालयात घडलेली ऑक्सिजनची गळतीची दुर्घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेची सखोल चौकशी व्हावी. तसेच अशा प्रकारची घटना पुन्हा होउ नये यासाठी संपूर्ण राज्यात खबरदारी घेण्यात यावी, असे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
नाशिक महानगरपालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात आज दुपारी ऑक्सिजनची गळती झाली. यामध्ये २२ रुग्णांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेबद्दल बोलताना फडणवीस म्हणाले, नाशिकमध्ये घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या संपूर्ण घटनेचा कोण जबाबदार आहे, याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. तसेच राज्यात अन्य कोणत्याही रुग्णालयात अशी दुर्घटना होवू नये, यासाठी योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे.
नाशिकमध्ये ऑक्सिजनअभावी 22 जणांचा मृत्यू, 11 जणांची नोंद https://t.co/r6JDs6ocZv
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 21, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
नाशिक दुर्घटना : मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपये मदत जाहीर, मोदी – शहांसह अनेकांच्या प्रतिक्रिया, चौकशीचे आदेश https://t.co/31AmFVBfk0
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 21, 2021
ऑक्सिजन अभावी नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयातील २२ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. ही दुर्घटना ऑक्सिजन टाकीत गळती झाल्यामुळे घडली. रुग्णालयात १५० रुग्ण दाखल होते. यातील व्हेंटिलेटरवर असणाऱ्या २३ जणांपैकी २२ जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करण्यात येत असून कारवाईची मागणी केली जात आहे. दरम्यान निष्काळजीपणाने अजून किती बळी घेणार आहात? अशी विचारणा विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.
निष्काळजीपणाने अजून किती बळी घेणार आहात?नाशिकच्या रुग्णालयात झालेली ऑक्सिजन टँकर गळती दुर्दैवी असून याबाबत आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. घटनेला जबाबदार असणार्यांवर त्वरित कारवाई करून अशा घटना पुन्हा घडू नयेत याची काळजी घेण्यास सांगितले@CMOMaharashtra@BJP4Maharashtra
— Pravin Darekar – प्रविण दरेकर ( Modi Ka Parivar) (@mipravindarekar) April 21, 2021
निष्काळजीपणाने अजून किती बळी घेणार आहात?नाशिकच्या रुग्णालयात झालेली ऑक्सिजन टँकर गळती दुर्दैवी असून याबाबत आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. घटनेला जबाबदार असणार्यांवर त्वरित कारवाई करून अशा घटना पुन्हा घडू नयेत याची काळजी घेण्यास सांगितले.
धक्कादायक! अंबाजोगाईत ६ कोरोना रुग्णांचा ऑक्सिजन खंडित झाल्याने मृत्यू, मात्र प्रशासनाने आरोप फेटाळला https://t.co/ups04lFuCO
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 21, 2021
निष्काळजीपणाने अजून किती बळी घेणार आहात?नाशिकच्या रुग्णालयात झालेली ऑक्सिजन टँकर गळती दुर्दैवी असून याबाबत आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. घटनेला जबाबदार असणार्यांवर त्वरित कारवाई करून अशा घटना पुन्हा घडू नयेत याची काळजी घेण्यास सांगितले, असे ट्विट प्रवीण दरेकर यांनी केले आहे. त्याचबरोबर तत्पूर्वी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी मनपा आयुक्तांविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
मी फोन करुन वेगळ्या भाषेत बोलल्यानंतर ऑक्सिजन टँकर सोडला : महसूल मंत्री थोरात https://t.co/mddkicOlcp
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 21, 2021