मुंबई : मुंबईच्या शाहनवाज शेख यांना सध्या ‘ऑक्सिजन मॅन’ म्हणून ओळखलं जातंय. त्यांनी रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा सुरू ठेवण्यासाठी आपली एसयूव्ही कार देखील विकली आहे. ‘कार 22 लाख रुपयांना विकल्यानंतर 160 ऑक्सिजन सिलिंडर खरेदी करू शकलो व रुग्णांना ते पोहोचवल्याचं शेख यांनी सांगितलं. गेल्यावर्षी शाहनवाज यांच्या मित्राच्या पत्नीचं ऑक्सिजन अभावी निधन झालं होतं. याचा मोठा परिणाम शाहनवाज यांच्या मनावर झाला होता.
विद्यापीठांच्या सर्व परीक्षा ऑनलाईन होणार https://t.co/h6XJHKcyIW
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 22, 2021
कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा कमी पडत असल्याच्या बातम्या सातत्याने समोर येत आहेत. बुधवारी नाशिकमध्ये तर ऑक्सिजन टँकरला गळती लागल्याने जवळपास 22 रुग्णांचा ऑक्सिजन पुरवठा खंडित झाल्याने मृत्यू झाला. अत्यवस्थ रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासत आहे. ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेतच मात्र खाजगी पातळीवर देखील अनेकजण मदत करण्यासाठी पुढे येत आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
यामध्ये मुंबईच्या शाहनवाज शेख यांचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल. ऑक्सिजनसाठीची शेख यांची कामगिरी पाहून त्यांना भागात ‘ऑक्सिजन मॅन’ म्हणून ओळखलं जातंय. ते त्यांच्या पातळीवर लोकांपर्यंत ऑक्सिजन पोहोचविण्याचे सतत काम करत आहेत.
पॉईंटमन मयुर शेळकेने वाचवला चिमुकल्याचा जीव, होतोय कौतुकाचा वर्षाव, पहा व्हिडिओ, रेल्वेने दिलेल्या बक्षिसाची अर्धी रक्कम मयुर देणार त्या 'अंध' मातेलाhttps://t.co/DOcdLsV2F9
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 22, 2021
शाहनवाज यांना सतत ऑक्सिजनची मागणी असणार्या लोकांचे कॉल येत आहेत. अशा परिस्थितीत, ते प्रत्येकास मदत करण्याचा प्रयत्न करतात, परंतु मर्यादित स्त्रोतांमुळे ते केवळ काही लोकांना मदत करू शकत होते. म्हणून त्यांनी विचार करून अखेर रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा सुरू ठेवण्यासाठी आपली एसयूव्ही कार देखील विकली. कार 22 लाख रुपयांना विकल्यानंतर 160 ऑक्सिजन सिलिंडर खरेदी करू शकलो आणि आवश्यक रुग्णांना आम्ही ते पोहोचवले, असे शेख म्हणाले.
दोन दिवसांपूर्वी चाहत्याने किस केलेली अभिनेत्री अर्शी खान कोरोना पॉझिटिव्ह #ArshiKhan #surajyadigital #सुराज्यडिजिटल #actresses #coronavirus pic.twitter.com/YWxxdzEzrz
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 22, 2021