हरिद्वार : उत्तराखंडच्या हरिद्वारमधील पतंजली योगपीठातील 83 जणांचा कोरोनाची लागण झाली आहे. या सर्वांना विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे योगगुरु रामदेव बाबा यांचीही कोरोना चाचणी होण्याची शक्यता आहे.
बाबा रामदेव ने पिछले दिनों कोरोनिल लांच किया था, दावा किया था इसके प्रयोग के बाद कोरोना नहीं होगा।#BabaRamdev #Patanjali #Coronavirus @moliticsindia https://t.co/bWsjjI1sSa
— Prajjawal Kumar Yadav 🇮🇳 (@PrajjawalkumarG) April 23, 2021
योगपीठात इतक्या मोठ्या संख्येनं कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. गरज भासल्यास रामदेव बाबा यांचीही कोरोना चाचणी करण्यात येईल, असं हरिद्वारचे सीएमओ डॉक्टर शंभू झा यांनी सांगितलं.
विरारमधील रूग्णालयाला आग; मृतांचा आकडा 13 वर, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता https://t.co/zYuCLhYDnb
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 23, 2021
बाबा रामदेव यांनी कोरोनावर औषधही आणलं होतं. कोरोनापासून बचाव करण्यासाठी हे औषध खूप फायद्याचं ठरेल, असा दावाही त्यांनी केला होता. हे औषध वादातही सापडलं होतं.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पतंजली योगपीठच्या अनेक संस्थांमध्ये दर दिवशी कोरोना रुग्ण मिळत आहेत, अशी माहिती मिळाली आहे. असे एकूण 83 जण कोरोनाग्रस्त असल्याचं समजलं आहे. त्यांना आयसोलेट करण्यात आलं आहे. आता संस्थेथील इतर लोकांसह बाबा रामदेव यांचीही कोरोना टेस्ट केली जाऊ शकते.
नदीम – श्रवण जोडीतला संगीतकार श्रवण राठोड यांचे निधन, खूप रोमँटिक गाणी प्रसिद्धhttps://t.co/hRm2nT1hJm
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 23, 2021
हरिद्वारमधील सीएमओ डॉक्टर शंभू झा यांनी सांगितलं, 10 एप्रिलपासून आतापर्यंत पतंजली योगपीठ आचार्यकुलम आणि योग ग्राममध्ये 83 कोरोनाग्रस्त सापडले आहेत. या कोरोना रुग्णांना पतंजली परिसरात आयसोलेट करण्यात आलं आहे. गरज पडल्यास बाबा रामदेव यांचीही कोरोना टेस्ट केली जाईल.