नवी दिल्ली : लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांचे निधन झाल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. परंतू ही बातमी खोटी आहे. सुमित्रा महाजन यांना इंदूरच्या बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांचा कोविड रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. दरम्यान, शशी थरूर, सुप्रिया सुळे यांनी ट्विट करून त्यांना श्रद्धांजली वाहिली. परंतु नंतर चूक लक्षात येताच थरूर यांनी ट्विट डिलीट केलं.
Thanks @kailashOnline. I have deleted my tweet. I wonder what motivates people to invent and spread such evil news that takes in people. My best wishes for Sumitra ji’s health and long life.
— Shashi Tharoor (@ShashiTharoor) April 22, 2021
लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन आजारी आहेत. इंदूरच्या माजी खासदार असलेल्या सुमित्रा महाजन यांना तापाची लक्षणं आढळल्यानंतर त्यांना बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आलेय. त्यांचा कोरोना अहवाल गुरुवारी निगेटिव्ह आला. त्यांना थोडासा ताप आहे. परंतु त्यांची तब्येत हळूहळू सुधारत आहे. विशेष म्हणजे सुमित्रा महाजन यांच्या निधनाची बातमीही सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरलीय. शशी थरूर आणि सुप्रिया सुळे यांसारख्या दिग्गज नेत्यांनी त्यांना ट्विटरवरून श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर ही बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली.
I am relieved if that is so. I received this from what I thought was a reliable source: “पूर्व लोकसभा अध्यक्ष श्रीमती सुमित्रा महाजन जी हमारे बीच नहीं रहीं.
ईश्वर दिवंगत आत्मा को अपने श्रीचरणों में स्थान दें.🙏” Happy to retract & appalled that anyone would make up such news. https://t.co/3c8pDGaBRv— Shashi Tharoor (@ShashiTharoor) April 22, 2021
काँग्रेस नेते शशी थरूर यांनी ट्विट करत सुमित्रा महाजन यांच्या निधनाची बातमी दिली होती. परंतु कैलास नावाच्या ट्विटर युजर्सने सुमित्राताई स्वस्थ असल्याचं रिट्विट करून त्यांना सांगितलं. त्यानंतर शशी थरूर यांनीसुद्धा सुमित्रा महाजन यांच्या निधनाच्या माहितीचं ट्विट डिलीट केलं.
महाराष्ट्रात प्रवासासाठी लागणार ई-पास, वाचा सविस्तर बातमी https://t.co/LwenMMgTNj
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 23, 2021
विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनीही ट्विटरवर सुमित्रा महाजन यांचं निधन झाल्याचं सांगत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली होती. पण हे वृत्त खोट असल्याचं समजल्यानंतर सुप्रिया सुळेंनीही ट्विट काढून टाकलंय.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, काँग्रेस नेते शशी थरूर यांनी सोशल मीडियावर ट्वीट करुन त्यांना श्रद्धांजली वाहिली होती. अनेक माध्यमांनीदेखील याबाबतचं वृत्त प्रसारित केलं. या संपूर्ण प्रकरणावर आता सुमित्रा महाजन यांची प्रतिक्रिया आली आहे.
* सुमित्रा महाजन यांची प्रतिक्रिया
सुमित्रा महाजन म्हणाल्या, की खात्री केल्याशिवाय माध्यमांनी अशा प्रकारचं वृत्त प्रसारित करणं अत्यंत चुकीचं आहे. माध्यमांनी निदान प्रशासनाकडून या वृत्ताबाबत खात्री करुन घ्यायला हवी होती. पुढे त्या म्हणाल्या, की माध्यमांमध्ये ही बातमी पाहिल्यानंतर मुंबईतून मला माझ्या अनेक नातेवाईकांचे फोन आले.
पतंजली योगपीठात कोरोनाचा शिरकाव, रामदेव बाबांची कोरोना टेस्ट होणार ? https://t.co/tlMIQf4Osy
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 23, 2021
काँग्रेस नेते शशी थरूर यांनी सोशल मीडियावर ट्वीट करत श्रद्धांजली वाहिली होती, याबाबत बोलताना त्या म्हणाल्या, की शशी थरुर यांचं ट्विट माझ्या भाचीनं रिट्विट केलं आणि तिनं त्यांना सवालही विचारला, की मी सुमित्रा महाजन यांची भाची आहे, तुम्हाला ही चुकीची बातमी कोणी दिली?
पंतप्रधान – मुख्यमंत्री बैठकीत नरेंद्र मोदी यांनी केजरीवालांना भर सभेत सुनावले, सोशल मीडियावर व्हायरल #सुराज्यडिजिटल #PMOIndia #CM #Meeting #NarendraModi #surajyadigital #ArvindKejriwal #अरविंदकेजरीवालhttps://t.co/EB6o4IJjhG
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 23, 2021
या वृत्तामागे काहीतरी गडबड असल्याचंही महाजन यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी असा सवालही उपस्थित केला, की मुंबईतील चॅनेलनंच अशा प्रकारचं वृत्त का दिलं, यामागे काहीतरी गडबड असण्याची शंका त्यांनी उपस्थित केली.
राज्य सरकार आता तरी जागे व्हा!!#surajyadigital #virar #Pravindarekar #bjp #भाजप #fire
नाशिकमधील ऑक्सिजन गळतीची घटना ताजी असतानाचं विरारमध्ये व्यवस्थेतील निष्काळजीपणा दिसून आला. याला संपूर्णपणे CMOMaharashtra 'जबाबदार' आहेhttps://t.co/M2xEpiwwSJ— Surajya Digital (@SurajyaDigital) April 23, 2021
सध्या देशभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यात मध्यप्रदेशातील इंदूर शहरातही कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. याचदरम्यान सुमित्रा महाजन यांच्या निधनाची खोटी बातमी समोर आल्यानंतर सोशल मीडियावरही ही बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती.
* सुमित्रा महाजन यांच्याविषयी
सुमित्रा महाजन या इंदूर लोकसभेच्या खासदार राहिल्या आहेत. त्यांनी १९८९ पासून सलग ८ वेळा इंदूरमधून निवडणृक लढवलीय. १९८४-८५ या काळात त्यांना इंदूरच्या उपमहापौरपदी नियुक्त करण्यात आलं. मात्र २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी पक्षाला पत्र लिहीत निवडणूक लढवायची नसल्याचं सांगत सक्रीय राजकारणातून बाहेर पडण्याचं जाहीर केलं होतं. सुमित्रा महाजन यांचा जन्म महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूणचा आहे. त्यांचं कुटुंब काही वर्षांपूर्वी मुंबईत येऊन स्थायिक झालं. इंदूरचे अधिवक्त जयंत महाजन यांच्याशी त्यांचा विवाह झाल्यानंतर त्या इंदूरमध्येच स्थायिक झाल्या आहेत.
पंढरपूर : आजची चैत्र यात्रा रद्द, उत्सव प्रतिकात्मक स्वरुपात साजरा होणार #surajyadigital #pandharpur #वारी #सुराज्यडिजिटल #Yatra #cancelled #चैत्रीवारी #उत्सव pic.twitter.com/XId25WpPDo
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 23, 2021