मुंबई : विरारमधील एका रुग्णालयातील अतिदक्षता विभागात भीषण आग लागली आहे. या आगीतील मृतांचा आकडा आणखी वाढला आहे. आतापर्यंत या आगीत 13 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तर काही रुग्णांची प्रकृती गंभीर आहेत. विरार पश्चिम येथील विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला आग लागली. दरम्यान, ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
घटना घडल्या नंतर वसई विरार महानगरपालिकेचे आयुक्त घटनास्थळी उपस्थित नव्हते. केवळ स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनीच इतर रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलवले. मृतांमध्ये पाच महिला आणि आठ पुरुषांचा समावेश आहे.
पंढरपूरमध्ये रुग्णालय फुल्ल, निवडणूक आली अंगलट, लोकप्रतिनिधी जबाबदारी स्वीकारणार का? https://t.co/7emecUPi2F
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 22, 2021
विरार पश्चिम येथील विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला मध्यरात्रीनंतर आग लागली. यामध्ये 13 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावर ही आग लागली. या आगीत 17 रुग्ण अडकले होते. 5 रुग्णांना दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
उमा सुरेश कनगुटकर, निलेश भोईर, पुखराज वल्लभदास वैष्णव, रजनी आर कडू, नरेंद्र शंकर शिंदे, जनार्दन मोरेश्वर म्हात्रे, कुमार किशोर दोशी, रमेश टी उपयान, प्रविण शिवलाल गोडा, अमेय राजेश राऊत, रामा अण्णा म्हात्रे, सुवर्णा एस पितळे, सुप्रिया देशमुखे असे मृत रुग्णांची नावे आहेत.
नाशिक येथे ऑक्सिजनच्या गळतीमुळे 24 रुग्णांना आपले प्राण गमावल्याची घटना ताजी असतानाच विरार येथे एका रुग्णालयाला लागलेल्या आगीत 13 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. चार मजली असणाऱ्या या रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावर ही आग लागली होती. अग्निशमन दल आणि पोलिसांनी आगीवर नियंत्रण मिळवले आणि इतर रुग्णांची सुटका करण्यात आली. तर पाच रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
विरार – विजय वल्लभ रुग्णालयाला भीषण आग, 13 जणांचा होरपळून मृत्यू #surajyadigital #hospital #सुराज्यडिजिटल #Virar #virarwest #fire #death pic.twitter.com/VaPIT6IaCW
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 23, 2021
मध्यरात्री ३ वाजल्याच्या सुमारास ही आग लागली. आग इतकी भीषण होती की, यात अतिदक्षा विभागातील 13 रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुळसळ यांनी दिली. सध्या अग्निशमन विभागाने आगीवर नियंत्रण मिळवले असून रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयांमध्ये हलविण्याचे काम सुरू आहे.