नवी दिल्ली : स्वयंघोषित धर्मगुरू नित्यानंदने ‘कैलासा’ हा स्वतःच्या स्वतंत्र देश घोषित केला आहे. आता या देशात भारतीय प्रवाशांवर प्रवेशबंदी घालण्यात आली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेमुळे ब्राझील, युरोपियन युनियन, मलेशिया आणि भारतातील नागरिकांना प्रवेश करण्यास बंदी आहे, असा आदेश काढण्यात आला आहे. दरम्यान बलात्काराचा आरोप झाल्यानंतर नित्यानंदने भारतातून पळ काढला होता.
खुशखबर ! भारतात कोरोनावरील औषधाला मान्यता https://t.co/SEG46wsKeT
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 23, 2021
नित्यानंद हा मूळचा तामिळनाडूचा आहे. त्याचे खरं नाव राजशेखरन असं आहे. २००० साली त्याने बंगळूरु शहराजवळ स्वत:चे आश्रम सुरु केले. तेव्हापासूनच तो चर्चेत आला. तो स्वत:ला ईश्वराचा अवतार मानतो. २०१० साली त्याच्यावर दोन मुलींचे अपहरण करुन त्यांच्यावर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला होता.
कोरोनाविरुद्धच्या लढ्यात आता हवाई दलाची मदत; ऑक्सिजन कंटेनर 'एअरलिफ्ट' https://t.co/7qk3FvkamN
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 23, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
स्वयंघोषित गुरू स्वामी नित्यानंद करोनाच्या फैलावामुळे भयभीत झाला आहे. त्याने वसवलेल्या कैलासा देशात करोनाचा फैलाव होऊ नये यासाठी आदेश काढला आहे. या आदेशानुसार भारतासह ब्राझील, युरोप आणि मलेशियातून येण्याऱ्या भक्तांना बंदी घालण्यात आली आहे. त्याचबरोबर जगभरातील आश्रमही बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच आश्रमातील भक्तांनाही कैलासात प्रवेश नाकारण्यात आला आहे. नित्यानंदने आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून ही माहिती दिली आहे.
KAILASA's #PresidentialMandate
Executive order directly from the #SPH for all the embassies of #KAILASA across the globe. #COVID19 #COVIDSecondWaveInIndia #CoronaSecondWave #Nithyananda #Kailaasa #ExecutiveOrder pic.twitter.com/I2D0ZvffnO— KAILASA's SPH NITHYANANDA (@SriNithyananda) April 20, 2021
नित्यानंदने वसवलेलं कैलासा बेट जगाच्या पाठीवर नक्की कुठे आहे याची अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. पण विविध माहितीच्या आधारे ऑस्ट्रेलियाच्या जवळपास कुठेतरी हे बेट असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ऑस्ट्रेलियाहून कैलासा बेटावर जाण्यासाठी नित्यानंद याने ‘गरूडा’ नावाची चार्टर्ड फ्लाईट सर्व्हिसही सुरू केल्याची चर्चा आहे. तर नित्यानंदने कैलासात आपलं सरकार, मंत्री, मंत्रालय यासह बँक, मॉल आणि अन्य सुविधा सुरु केल्याचाही दावा केला आहे.
मोठी दुर्घटना – जीप गंगेत कोसळली; 9 मृतदेह https://t.co/Ui2nVrKfJ4
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 23, 2021