मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सीबीआयने त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करुन घेतली आहे. तसेच देशमुख यांच्या घरी आणि इतर मालमत्तांवर छापे टाकले आहेत. मुंबईसह जवळपास 10 ठिकाणी सीबीआयने छापे टाकल्याचे वृत्त समोर येत आहे. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी देशमुखांवर 100 कोटींच्या वसुलीचे आदेश पोलिसांना दिल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणात सीबीआय चौकशी करत आहे.
बुरगुंडा हरपला…भारुडरत्न निरंजन भाकरे (ब्लॉग)https://t.co/C08KFuUcL2
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 24, 2021
सीबीआयने गुन्हा दाखल केल्याने देशमुख यांच्या अटकेची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे कोर्टात जाऊन अंतरिम जामीन मिळवण्याचा पर्याय देशमुखांकडे असून ते कोर्टात जाणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचं घर आणि इतर मालमत्तांवर सीबीआय छापा टाकला आहे. मुंबईसह दहा ठिकाणी सीबीआयने धाड टाकली आहे. 100 कोटींच्या कथित वसुली प्रकरणी ही कारवाई केल्याचं समजतं. दरम्यान अनिल देशमुख सध्या नागपूरमध्ये आहेत.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या 100 कोटींच्या कथित वसुलीप्रकरणी सीबीआयने सुरुवातीला अनिल देशमुख यांची चौकशी केली होती. त्यानंतर गुन्हा दाखल झाला आणि आता देशमुख यांच्या घरासह मालमत्तांवर छापा टाकला आहे.
'भारूडरत्न' निरंजन भाकरे यांचे कोरोनाने निधन https://t.co/vQSeDAEnJg
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 24, 2021
100 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांची 11 तास चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर सीबीआयने एक अहवाल तयार केला आहे. हा अहवाल सीबीआयने अद्याप कोर्टात सादर केला नाही. मात्र, अहवाल सादर करण्यापूर्वीच देशमुखांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
दरम्यान, सीबीआयने आज अनिल देशमुखांच्या घर आणि कार्यालयासह 10 ठिकाणी छापे मारले आहेत. देशमुख राहत असलेल्या मुंबईतील ज्ञानेश्वरी बंगल्यातही सीबीआयने छापे मारले असल्याचं सूत्रांनी सांगितलं. रात्री उशिरा सीबीआयच्या टीमने येऊन छापेमारी केली आणि पहाटे ही टीम निघून गेली. ज्ञानेश्वरी बंगल्यातील सीसीटीव्ही फुटेजही सीबीआयने नेल्याचं सांगण्यात येतं. तसेच इतर ठिकाणीही सीबीआयने छापे मारले असून कागदपत्रांची छाननी करण्यात येत असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
सोलापूर शहरातील लसीचा साठा संपला, जवळपास 35 लसीकरण केंद्रे बंद #Vaccinestocks #Solapurcity #सोलापूरशहर #depleted #लसीकरण #लसीचासाठा #35vaccination #centers #closed #केंद्रे #बंद pic.twitter.com/xtSOjm06s2
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 24, 2021
कोर्टाने सीबीआयला 100 कोटी वसुलींच्या आरोपाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर सीबीआयने एसपी संजय पाटील, याचिकाकर्त्या जयश्री पाटील, निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचीही सीबीआयने चौकशी केली आहे. त्यानंतर देशमुख यांचीही कसून चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर सीबीआयने हे पाऊल उचललं आहे. या प्रकरणात तथ्य असेल तर गुन्हा दाखल करण्याची मुभा कोर्टाने सीबीआयला दिली होती. त्यामुळे सीबीआयने गुन्हा दाखल केल्याचं सूत्रांनी सांगितलं.