अक्कलकोट : अनेक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या स्वामी समर्थांच्या अक्कलकोट नगरीतील आज रविवारी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते कोव्हिड हेल्थ सेंटरचे उद्घाटन झाले.
अक्कलकोट तालुक्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बैठक घेतली. अक्कलकोट तालुका पंचायत समितीच्या सभागृहात ही बैठक झाली. आढावा बैठकी नंतर श्री स्वामी समर्थ मंदिराच्या हॉस्पिटल जागेत डेडीकेटेड कोव्हिड हेल्थ सेंटरचे उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले. यावेळी खासदार जयसिध्देश्वर महास्वामी, आमदार सचिन कल्याणशेट्टी, सभापती सुनंदा गायकवाड, उपनगराध्यक्ष यशवंत घोंगडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव उपस्थित होते.
कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात 5 दिवस पावसाची शक्यता https://t.co/052tFoIqVp
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 25, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
अक्कलकोट तालुक्यात कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी पायाभूत सुविधा उभारण्यांसाठी आमदार निधीचा वापर करा, अशा सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज बैठकीत केल्या.
भाजप नेते म्हणाले प्रणिती शिंदेंना करा पालकमंत्री, पालकमंत्री म्हणाले मी संन्यास घेईन https://t.co/a0uvutY8Wq
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 25, 2021
आढावा बैठकीस सुरवातीस उपजिल्हाधिकारी सुप्रिया डांगे यांनी अक्कलकोट मधील परिस्थितीची माहिती दिली. तालुक्यातील १३१ पैकी २१ गावांत सध्या एकही कोरोनाचा पेशंट नसल्याचे सांगितले. अक्कलकोट मधील नागरिक उपचारासाठी सोलापूर शहरात जातात. मात्र तरीही अक्कलकोटमध्ये कोविड केअर सेंटर उभारण्यात यावे. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधांची तयारी करण्यासाठी आमदार निधीचा वापर करावा, असे पालकमंत्री भरणे यांनी सांगितले.
अक्कलकोट तालुक्यात सहा गावात कोविड केअर सेंटर सुरु केले जाणार आहे. त्याचबरोबर भक्त निवास आणि अन्नछत्र निवासात कोविड केअर सेंटर सुरु केले जाणार आहे. संभाव्य रुग्णांची संख्या वाढवणार हे गृहीत धरुन कोविड केअर सेंटर सुरु करण्याची तयारी ठेवा. तालुक्यातील लसीकरणाचा वेग कायम ठेवावा. १ मे पासून १८ वर्षावरील सर्वांना लस दिली जाणार आहे. यासाठी नियोजन केले जावे, असे पालकमंत्री भरणे यांनी सांगितले.
सोलापूर : भाजप नगरसेवक सुरेश पाटील यांना बैठकीस जाताना अडवले, पोलिसांशी झालेली चर्चा #surajyadigital #bjp #solapur #Coronavirus #सोलापूर #policehttps://t.co/D41g6MrH7v
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 25, 2021
बैठकीस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतल जाधव जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, तहसीलदार अंजली मरोड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रोहन वायचळ, शिक्षणाधिकारी संजय राठोड, डॉ. अशोक राणे आदी उपस्थित होते.
आधी लगीन लसीकरणाचं; मुलाच्या लग्नाचा पैसा लसीकरणावर खर्च करणार, या भाजप नेत्याचे कौतुक https://t.co/N4PzsyV5vX
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 25, 2021
* अशी आहे सेंटरमध्ये सुविधा
कोविड हेल्थ केअर सेंटरमध्ये जवळपास सहा वैद्यकीय अधिकारी व ११ कर्मचारी कार्यरत असणार आहेत. २०० बेडच्या या कोविड सेेंटरमध्ये जवळपास २५ ऑक्सिजन बेड असणार आहेत. समर्थांच्या पुण्यनगरीत मोठा दवाखाना नसल्याने आमदार सचिन कल्याणशेट्टी व तहसीलदार अंजली मरोड व जिल्हा आरोग्य अधिकारी आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ अशोक राठोड यांच्या प्रयत्नाने सेंटरची सुरुवात झाली आहे. यामुळे गावक-यांना दिलासा मिळणार आहे.