माजी मंत्री आणि भाजप नेते संजय देवतळे यांचे निधन

0
1

चंद्रपूर : माजी पालकमंत्री आणि भाजप नेते संजय देवतळे यांचे आज निधन झाले. संजय देवतळे यांना कोरोनाची लागण झाली होती. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर नागपूरमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, उपचारादरम्यान हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांचे आज निधन झाले.

जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तसेच भाजप नेते संजय देवतळे यांचे आज (25 एप्रिल) निधन झाले. त्यांना कोरोनाची लागण झाली होती.

मागील काही दिवसांपूसन त्यांच्यावर नागपूरमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, उपचारादरम्यान हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांची प्राणज्योत मालवली. महाराष्ट्र काँग्रेस कमिटीने त्यांना  ट्वीटद्वारे श्रद्धांजली वाहिली आहे.

संजय देवतळे यांना कोरोनाची लागण होण्यापूर्वी त्यांच्या घरातील एका सदस्याला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर खबरदारी म्हणून त्यांची चाचणी करण्यात आली होती. यामध्ये कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांच्यावर नागपूरमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मागील सहा दिवसांपसून हे उपचार सुरु होते. मा६, आज अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांचे निधन झाले.

* संजय देवतळे यांची राजकीय कारकीर्द

संजय देवतळे यांचे आज निधन झाले. ते 4 वेळा काँग्रेसच्या तिकिटावर वरोरा विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदासह राज्याच्या पर्यावरण मंत्रिपदाचा कारभारसुद्धा त्यांनी सांभाळला. त्यांनी 2014 च्या निवडणुकीत भाजपात प्रवेश केला. नंतर 2019 ची निवडणूक त्यांनी शिवसेनेच्या तिकिटावर लढवली. त्यानंतर देवतळे यांनी परत भाजपात नुकताच प्रवेश केला होता.

https://twitter.com/SurajyaDigital/status/1386271757313605633?s=19