पुणे : कोरोना बळींचा आकडा वाढत आहे. त्यामुळे पुण्यातील सर्व स्मशानभूमी फुल झाल्या आहेत. तिथे जागा नसल्याने मोकळ्या मैदानात अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय पुणे महापालिकेने घेतलाय. पुण्यातील 24 स्मशानभूमींमध्ये येणाऱ्या मृतदेहांची संख्या वाढतेय. त्यामुळे विद्यूत दाहिनींमध्ये बिघाड होत होताहेत. पुण्यात दिवसाला 100 लोकांचा मृत्यू होत आहे. त्यामुळे मृतांच्या नातेवाईकांना वाट पाहावी लागत आहे.
शेजाऱ्याला बाळ झाल्यावर तुम्ही पाळणा हालवणार का', मोफत लसीवरुन भाजप नेते सदाभाऊ खोतांचा टोला #surajyadigital #सदाभाऊखोत #politics #political #सुराज्यडिजिटल #CoronaVachttps://t.co/ei2G8YB7Es
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 26, 2021
पुण्यात आतापर्यंत 6 हजार लोकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुण्यातील सर्वच्या सर्व 21 स्मशानभूमींवर लोड आला आहे, असं येथील कैलास स्मशानभूमीतील एका कर्मचाऱ्याने सांगितलं. पुण्यातील 24 स्मशानभूमींमध्ये येणाऱ्या मृतदेहांची संख्या वाढत आहे. त्यामुळे विद्यूत दाहिनींमध्ये तांत्रिक बिघाड होत असल्याच्याही घटना घडत आहेत. गेल्या आठवड्यात अकराहून अधिक गॅस आणि विद्युत दाहिनींमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. त्यामुळे मृतांच्या नातेवाईकांना तास न् तास वाट पाहावी लागली होती.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पुण्यात दिवसाला शंभर लोकांचा कोरोनाने मृत्यू होत आहे. त्याशिवाय 120 हून अधिक मृतदेह अंत्यसंस्कारांसाठी स्मशानभूमीत येत आहेत. रस्ते अपघात, नैसर्गिक मृत्यू आणि इतर आजारांमुळे होणारे हे मृत्यू आहेत, अशी माहिती पालिकेकडून दिली आहे.
कोरोना काळात भारताला गुगल आणि मायक्रोसॉफ्टकडून मोठी मदत https://t.co/okOUGRMxOw
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 26, 2021
पुण्यातील 24 स्मशानभूमीत सलग अंत्यसंस्कार होत आहेत. त्यामुळे स्मशानभूमीतील लोखंडाच्या सळ्याही पिघळण्यास सुरुवात झाली आहे. स्मशानभूमीतील चिमण्याही खराब होत आहेत. त्याशिवाय ओव्हर हिटिंगही सुरू आहे. स्मशानभूमीत कोणतीही तांत्रिक अडचण निर्माण होऊ नये म्हणून अभियंत्यांची एक टीम तैनात करण्यात आली आहे. तसेच चार अतिरिक्त विद्यूत दाहिन्या बनविण्यासाठी 240 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे. स्मशानभूमीत सलग अंत्यसंस्कार होत असल्याने अखेर निर्जन आणि मोकळ्या जागांवर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत.
चेन्नई सुपर किंग्सवर शोककळा, संचालक सबारत्नम यांचे निधन https://t.co/MoidYLY4X0
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 26, 2021