नवी दिल्ली : भारतात कोरोनाचे संकट असताना गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. सुंदर पिचाई यांनी अनुदान देण्यासाठी यूनिसेफ आणि गेटइंडियाला 135 कोटी रुपयांचा मदत निधी जाहीर केला आहे. त्याशिवाय गुगल आणि त्यांची टीम मेडिकल सप्लायही करणार आहे. तसंच हाय रिक्स कम्युनिटीची मदत करणाऱ्या संघटनांनाही मदत करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. पिचाई यांनी एक पोस्ट शेअर करत यासंबंधी माहिती दिली आहे.
Devastated to see the worsening Covid crisis in India. Google & Googlers are providing Rs 135 Crore in funding to @GiveIndia, @UNICEF for medical supplies, orgs supporting high-risk communities, and grants to help spread critical information.https://t.co/OHJ79iEzZH
— Sundar Pichai (@sundarpichai) April 26, 2021
गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी अनुदान देण्यासाठी यूनिसेफ आणि गेटइंडियाला 135 कोटी रुपयांचा मदत निधी जाहीर केला आहे. देशभरात वेगाने वाढणाऱ्या कोरोना संकटाच्या काळात गुगलचे सीईओ सुंदर पिचाई मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. कोरोनामुळे भारतात निर्माण झालेली गंभीर स्थिती पाहता त्यांनी 135 कोटी रुपयांच्या रिलीफ फंडची घोषणा केली आहे.
Google and Microsoft CEO come forward to help India overcome the COVID-19 crisis. pic.twitter.com/iAmZadfJds
— Our Vadodara (@ourvadodara) April 26, 2021
त्याशिवाय मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनीही मदतीचा हात पुढे केला आहे. कंपनी भारताला मदत करण्यासाठी प्रयत्नशील असून ऑक्सिजन उपकरणंही खरेदी करण्यासाठी मदत करणार असल्याचं नडेला यांनी सांगितलं. त्याशिवाय गुगल आणि त्यांची टीम मेडिकल सप्लायही करणार असल्याचं ते म्हणाले. तसंच हाय रिक्स कम्युनिटीची मदत करणाऱ्या संघटनांनाही मदत करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
भारताला कोरोना लशीच्या उत्पादनासाठी कच्चा माल देण्यास अमेरिका तयार https://t.co/JI87xt17kz
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 26, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सत्या नडेला यांनी ट्विट करत म्हटलं, ‘भारतातील सद्य स्थिती पाहून फार दु:खी आहे. अमेरिकेच्या सरकारनं मदतीसाठी पुढाकार घेतल्याचा मला आनंद आहे’, मायक्रोसॉफ्ट सर्व प्रकारच्या मदतीसाठी हातभार लावणार असल्याचं सांगत क्रिटिकल ऑक्सिजन कंसन्ट्रेशन डिवाइस खरेदी करण्यासाठीही आधार देणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
* अभियान राबवणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही अनुदान
मोहिम राबवणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या देणग्याही अनुदानामध्ये समाविष्ट केल्या आहेत. ब्लॉग पोस्ट असं म्हटलं आहे की, आतापर्यंत 900 हून अधिक Google कर्मचाऱ्यांनी हाय रिस्कवाल्या देशांना पाठिंबा देणाऱ्या संस्थांना 3.7 कोटी रुपयांचं योगदान दिलं आहे.
I am heartbroken by the current situation in India. I’m grateful the U.S. government is mobilizing to help. Microsoft will continue to use its voice, resources, and technology to aid relief efforts, and support the purchase of critical oxygen concentration devices.
— Satya Nadella (@satyanadella) April 26, 2021
मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनी ट्विट करत सांगितलं, की भारताची सध्याची स्थिती पाहून अतिशय दु:ख होत आहे. अमेरिकी सरकार मदतीसाठी पुढे आल्याने मी त्यांचा आभारी आहे. मायक्रोसॉफ्ट या संकटकाळात मदतीसाठी संसाधनं, तंत्रज्ञानाचा वापर करत राहील. तसंच महत्त्वपूर्ण ऑक्सिजनच्या डिव्हाईस खरेदीसाठीही मदत करेल.
सलमान खाननं 5 हजार लोकांना केलं अन्न वाटप https://t.co/kszWUViuIz
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 26, 2021