नवी दिल्ली : अमेरिकेने कोरोनावरील कोव्हिशिल्ड लशीच्या उत्पादनासाठी आवश्यक असलेला कच्चा माल भारताला देण्यास अखेर तयारी दर्शवली आहे. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन यांच्याशी चर्चा केल्यानंतर अमेरिकने तातडीने मदत पाठवू असे म्हटले आहे. मात्र याआधी कच्चा माल देण्यात अमेरिकेने नकार दिला होता. सध्या पुण्यात कोव्हिशिल्डचे सिरमद्वारे उत्पादन होत आहे.
#journalist #published #surajyadigital मेलेल्या सरकारी व्यवस्थेचा माहूत" या शीर्षकाखाली एका ऑस्ट्रेलियन वृत्तपत्रात प्रसिद्ध जागतिक व्यंगचित्रकार डेव्हिड रोवे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यप्रणालीचे रेखाटलेले व्यंगचित्र भारत देशाची झालेली अवस्था जगासमोर मांडणारी आहे. pic.twitter.com/sdvazSdhIs
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 25, 2021
भारतात करोनाची दुसरी लाट आल्यानं आरोग्य यंत्रणा कोलमडून गेली आहे. त्यामुळे लसीकरण वेगानं व्हावं अशी मागणी होत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांना लस देण्याचं जाहीर केलं आहे. मात्र लस निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल नसल्याने अडचणी निर्माण झाल्या होत्या. अमेरिकेच्या आडमुठ्या भूमिकेमुळे लस उत्पादनावर परिणाम झाला होता. त्यानंतर भारतानं वारंवार अमेरिकेकडे कच्च्या मालाची मागणी केली होती. अखेर अमेरिकेनं भारताला लसी निर्मितीसाठी कच्चा माल देण्याचं मान्य केलं आहे. बायडेन प्रशासनाकडून भारताला ही माहिती देण्यात आली आहे. अमेरिकेचे सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन यांनी भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना ही माहिती दिली. त्यामुळे पुन्हा एकदा लस निर्मितीला जोर येणार आहे.
कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात 5 दिवस पावसाची शक्यता https://t.co/052tFoIqVp
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 25, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
गेल्या वर्षी अमेरिकेत करोनाची भीषण लाट आली होती. तेव्हा भारताने हायड्रॉस्किक्लोरिक्वीन भारतातून अमेरिकेला पाठवली होती. त्यावेळी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला विनंती केली होती. भारताने तात्काळ विनंतीला मान देत कोट्यवधी गोळ्यांचा पुरवठा केला होता.
लसींच्या निर्मितासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा तुटवडा निर्माण झाला असल्याची माहिती सिरम इन्स्टिट्युटचे सीईओ अदर पुनावाला यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती. अमेरिका आणि युरोपने पुरवठा थांबवला असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. अद्यापही कच्च्या मालाचा पुरवठा होत नसल्याने अदर पुनावाला यांनी आता थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनाच हात जोडून विनंती केली होती. त्यानंतर अमेरिकेवर दबाव वाढू लागला होता. अखेर अमेरिकेनी भारताची मागणी मान्य केली असून लवकरच लसी निर्मितीसाठी कच्चा मालाचा पुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे लस निर्मितीची अडचण दूर होणार आहे.
दिलासादायक! पुण्यात आज 4 हजार 759 तर मुंबईत 8 हजार 478 कोरोना रुग्णांना डिस्चार्ज https://t.co/UJtRWNsW40
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 25, 2021
सीरम इन्स्टिट्युटतर्फे Astrazeneca आणि Oxford यांच्यासोबत संयुक्तपणे Covishield लसीचं उत्पादन केलं जात आहे. सध्या महिन्याला ६ ते ६.५ कोटी डोसचं उत्पादन सीरमच्या पुण्यातील प्लांटमध्ये सुरू असून ते १० ते ११ कोटींपर्यंत नेण्याचं ध्येय या वर्षी जूनपर्यंत गाठण्याचा संकल्प अदर पूनावाला यांनी बोलून दाखवला होता.