कोल्हापूर : राज्यात कोरोनाचे रूग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. कोल्हापूरच्या जोतिबा डोंगरावर आज सोमवारी (26 एप्रिल) जोतिबाची यात्रा होणार होती. यात मानकऱ्यांची कोरोना तपासणी करण्यात आली. या तपासणीत तब्बल 5 मानकरी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे ही यात्रा रद्द करण्यात आलीये. तसेच जोतिबा डोंगरावरही अनेकांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती आहे. दरम्यान, जोतिबा मंदिराकडे जाणारे सर्वच रस्ते बंद करण्यात आले आहेत.
आदित्य ठाकरेंच्या ट्विटनंतर भाजप आमदार पडळकरांचा संताप https://t.co/XtDtHFjThH
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 26, 2021
महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्यात लोकांची अंमलबजावणी करायला सुरुवात झाली आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे आज होणारी जोतिबा यात्रा रद्द करण्यात आली आहे.कोल्हापूरच्या जोतिबाच्या डोंगरावर होणारी यात्रा रद्द करण्यात आली आहे. यात्रेतील मानकऱ्यांपैकी 5 मानकरी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने ही यात्रा रद्द करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे जोतिबा डोंगरावर अगदी मोजक्याच मानकऱ्यांच्या उपस्थितीत यात्रा पार पडणार होती.
आठवणी ❤🙏…. #जोतिबा, #कोल्हापूर pic.twitter.com/RHRdZDi0mD
— Supriya patil (@Supriyas_tadka) April 26, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाकडून मानकऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. पण त्यातून धक्कादायक गोष्ट समोर आली कारण तब्बल 5 जण कोरोना बाधित असल्याचे त्यातून स्पष्ट झालं. त्याच पार्श्वभूमीवर आता जोतिबाची यात्रा रद्द करण्यात आली आहे. कोरोनाचं सावट यावर्षी जोतिबा यात्रेवरही आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
शिवसेनेचे दादा भुसे यांच्या मुलाचा खासदार राजन विचारेंच्या कन्येशी विवाह https://t.co/G65k3T4Vg5
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 26, 2021
दरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून कोल्हापुरातील प्रशासनाने जोतिबा कडे जाणारी सर्व मार्ग आणि डोंगराकडे जाणारे सर्व रस्ते बंद केले आहेत. तसेच माध्यमांच्या प्रतिनिधींना ही आता जोतिबा डोंगरावर प्रवेश मिळणार नाही. यापूर्वीही अनेक कार्यक्रम आणि समारंभ कोरोनामुळे रद्द करण्यात आले होते. त्याच पार्श्वभूमीवर अवघ्या काही लोकांमध्येच पार पडणारा हा समारंभही नाईलाजाने प्रशासनाला रद्द करावा लागत आहे.
उजनीच्या पाण्यावरुन आमदार संजय शिंदे सोशल मीडियावर झाले आक्रमक https://t.co/OJocE7lYj0
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 26, 2021