मुंबई : महाराष्ट्रात मागील 24 तासात कोरोनाचे 48,700 रूग्ण आढळले तर 524 जणांचा मृत्यू झाला. तसेच, आज तब्बल 71,736 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर सध्या 6,74,770 जणांवर उपचार सुरू आहेत. यासोबतच राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 43,43,727 झाली आहे. तर आतापर्यंत 65,284 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच, राज्यात आतापर्यंत 36,01,796 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
राज्यात आज 71,736 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, राज्यात आजमितीस एकूण 36,01,796 कोरोना बाधित रुग्ण बरे झालेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 82.92 टक्के एवढे झालेय. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2,59,72,018 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 43,43,727 (16.72 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आलेत. सध्या राज्यात 39,78,420 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 30,398 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
भारत, हिम्मत बनाए रखो #StayStrongIndia #स्टेस्ट्रॉगइंडिया #surajyadigital #india #strong #staystrong #सुराज्यडिजिटल
अबू धाबीने कोविडच्या कठीण काळात तिरंगा फडकावून भारताला पाठिंबा दर्शविलाय…. pic.twitter.com/94UJl8PRKE— Surajya Digital (@SurajyaDigital) April 26, 2021
गेल्या काही दिवसांपासून मुंबईतही कोरोनाचा कहर पाहायला मिळत होता. मुंबईत आजही कोरोना रुग्णसंख्येत घट झालीय. आज एकूण कोरोना रुग्णसंख्या 4 हजारांखाली आलीय. 24 तासांत 3792 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मुंबईत गेल्या 24 तासांत 41 हजार चाचण्या झाल्याचीही माहिती मिळतेय.
शिवसेनेचे दादा भुसे यांच्या मुलाचा खासदार राजन विचारेंच्या कन्येशी विवाह https://t.co/G65k3T4Vg5
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 26, 2021
* मोठा दिलासा- राज्यात 6 दिवसात 4 लाख 42 हजार 466 रुग्ण कोरोनामुक्त
राज्यात कोरोना रुग्णांची वाढ होत असताना एक मोठी दिलासादायक बातमी समोर येत आहे. कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर गेल्या सहा दिवसात राज्यभरात 4 लाख 42 हजार 466 रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. तर सोमवारी (26 एप्रिल) 71 हजार 736 रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यात सर्वाधिक 13 हजार 674 रुग्ण पुणे येथील आहेत. आरोग्यमंत्र्यांनी ही माहिती दिली.
* राज्यात दिवसभरात 5 लाख जणांचे लसीकरण; विक्रमी नोंद
कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्रात आतापर्यंतची विक्रमी नोंद झाली आहे. सोमवारी (26 एप्रिल) सायंकाळी सहापर्यंत पाच लाखांहून अधिक नागरिकांना लस देण्यात आली. 3 एप्रिल रोजी 4 लाख 62 हजार नागरिकांचे लसीकरण करून महाराष्ट्राने राष्ट्रीय विक्रम नोंदविला होता. आतापर्यंत महाराष्ट्रात सुमारे 1 कोटी 48 लाखांच्या आसपास लसीकरण झाले आहेत.
जोतिबा यात्रेवर कोरोनाचे सावट, मानकरी पॉझिटिव्ह आल्यामुळे आजची यात्रा रद्द https://t.co/DPRNiCJuON
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 26, 2021