मुंबई : आता महाविकास आघाडीत मोफत लसीकरणावरून जोरदार वाद उफाळून आला आहे. काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी तर राष्ट्रवादीला थेट अभी जरा बाज आए, असा इशारा दिला आहे. राज्यात तीन पक्षाचे सरकार आहे आणि मोफत लसीकरण करण्याची घोषणा एकट्या राष्ट्रवादीकडून केली जात आहे. मोफत लसीकरणाचा निर्णय योग्य आहे. पण त्याची घोषणा सरकार करणार की केवळ एक मित्र पक्ष करणार?, असेही ते म्हणाले.
कोरोनामुळे नव्हे तर तोट्यामुळे सुमारे 18 प्रवाशी रेल्वे गाड्या आजपासून 11 मे पर्यंत रद्द, सोलापूर – मुंबईचाही समावेश https://t.co/SXIbrvd6hr
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 27, 2021
महाराष्ट्रात १८ वर्षांवरील लसीकरण मोफत करण्यात येणार असल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. मात्र, नवाब मलिक यांच्या घोषणेनंतर ठाकरे सरकारमधील मंत्र्यांमध्ये मोफत लसीकरणाबाबत मतभिन्नता असल्याची चर्चा सुरु आहे. काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
राज्यातील व्यक्तीचं मोफत लसीकरण करण्यात येईल व लसीकरणाचा खर्च राज्याच्या तिजोरीतून करण्यात येईल, असं नवाब मलिक यांनी म्हटलं होतं. तर, आदित्य ठाकरे यांनी लसीकरणाचे अधिकृत धोरण समितीद्वारे घोषित केलं जाईल, असं म्हटलं आहे. यामुळं नवाब मलिक यांनी केलेल्या लसीकरणाच्या घोषणेमुळं काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे, अशी शक्यता वर्तवण्यात येते आहे. काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी एक ट्विट करत राष्ट्रवादी काँग्रेसला फटकारलं आहे.
महाराष्ट्र में सरकार तीन पार्टियाँ चला रही हैं और मुफ्त #वैक्सीन देने की घोषणा अकेले #NCP कर रही है।
थोड़ा अटपटा लगा।
यह फैसला सही है।
लेकिन घोषणा सरकार करेगी या एक घटक दल ?
भीषण महामारी में क्रेडिट लेने की राजनीति सस्ती हरकत लग रही है।
अभी ज़रा बाज़ आएँ।#FreeVaccineForIndia— Sanjay Nirupam (@sanjaynirupam) April 26, 2021
संजय निरुपम यांनी ट्वीट केलं आहे. ‘राज्यात तीन पक्षाचं सरकार आहे आणि मोफत लसीकरणाची घोषणा एकट्या राष्ट्रवादीकडून केली जातेय. थोडसं वेगळं वाटतंय. मोफत लसीकरणाचा निर्णय योग्य आहे. पण त्याची घोषणा सरकार करणार की फक्त एक घटक पक्ष करणार? या महामारीत श्रेय घेण्याचं राजकारण अत्यंत वाईट आहे. राष्ट्रवादीनं असे प्रकार करु नये, असं संजय निरुपम यांनी म्हटलं आहे. तसंच, अभी जरा बाज आएँ,’ अशी टिप्पणीही त्यांनी केली आहे.
संपूर्ण देश #COVID19 शी लढत असताना अभिनेत्री तेजस्विनी पंडितने रक्तदान करून या लढ्यामध्ये आपले योगदान दिले. तेजस्विनीच्या कार्याबद्दल तिचे कौतुक होतंय. #COVID19 #tejaswinipandit #surajyadigital #सुराज्यडिजिटल #actresses #tejaswini #blooddonation pic.twitter.com/p5qZKVDWTG
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 27, 2021