मुंबई : अभिनेता आयुषमान खुराणा आणि त्याची पत्नी ताहिराने राज्याच्या मुख्यमंत्री रिलीफ फंडमध्ये मदत करण्याचे जाहीर केले आहे. राज्याला कोरोनाविरोधात लढण्यासाठी ही मदत करणार असल्याचे त्यांनी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून सांगितले. ही अशी वेळ आहे, ज्यावेळी आपण सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे आणि एकमेकांची काळजी घेतली पाहिजे, असे आयुषमानने म्हटले आहे.
संपूर्ण देशात लॉकडाऊन केल्यास महागाई वाढेल; आरबीआयचा इशारा https://t.co/3SrmUw4yhe
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 28, 2021
संपूर्ण देशभरात कोरोना रुग्ण झपाट्याने वाढताना दिसत आहे. त्या मृत्यूचे प्रमाणही वाढलेले दिसून येत आहे. अशातच अनेक उद्योगपतींनी कोरोनाच्या लढाईत आपला सहभाग नोंदवत राज्य तसेच केंद्र सरकारला मदत देऊ केली आहे. त्यात आता अभिनेता आयुष्मान खुराणा याने सुद्धा मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत देऊ केली आहे. या संदर्भातील माहिती त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीर केली आहे. तसेच चाहत्यांना पुढे येऊन मदत करण्याचे आव्हान केले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता अल्लू अर्जुनला कोरोना
https://t.co/eWqQMRHRhW— Surajya Digital (@SurajyaDigital) April 28, 2021
सोशल मीडियावर आयुषमान खुराणा आणि त्याची पत्नी ताहिरा यांनी एक पत्र शेअर केले आहे. ज्यात त्यांनी अशा प्रत्येक भारतीयांचे आभार मानले आहेत, ज्यांनी या संकटातून सतत पीडित लोकांसाठी योगदान देण्यास त्यांना प्रेरित केले आहे. यापूर्वी सुद्धा अनेक कलाकारांनी पुढे येऊन मदत जाहीर केली होती. त्यांनी म्हटले आहे की, या संकटाला आपण गेल्या एका वर्षापासून सामोरे जात आहोत. या महामारीने आपली मने मोडली, वेदना व दु:ख सहन करण्यास भाग पाडले.
लसीचा साठा संपला, पुण्यात अनेक केंद्रे बंद #CoronaVaccine #vaccine #pune #पुणे #कोरोना #surajyadigital #सुराज्यडिजिटल pic.twitter.com/8hPF90omEI
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 28, 2021
आपण सर्वांनी एकमेकांशी ऐक्य साधत, मानवता दाखवत या संकटाचा कसा सामना करावा, हे दाखवून दिले आहे. हे कोरोनाचे संकट आज पुन्हा एकदा आपल्याला धैर्य, प्रतिकारशक्ती आणि एकमेकांना पाठिंबा दाखवण्यास सांगत आहे. संपूर्ण देशभर लोक शक्य तितक्यांना मदत करण्यासाठी पुढे सरसावले आहेत. ताहिरा आणि मी ज्यांनी अधिक मदत करण्यासाठी आम्हाला प्रेरित केले, त्या सर्वांचे मी आभार मानतो. आम्ही अधिकाधिक लोकांना मदत करण्याचा सतत प्रयत्न केला आहे आणि आता आवश्यकतेच्या क्षणी महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांच्या मदत निधीमध्ये देखील हातभार लावला आहे.