पुणे : कोरोनाची लागण झालेले काँग्रेसचे महाराष्ट्रातील मोठे नेते आणि राज्यसभा खासदार राजीव सातव यांची प्रकृती गंभीर आहे. राजीव सातव यांच्यावर पुण्यातील जहांगीर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना पुण्यातून मुंबईत शिफ्ट करणार असल्याचे म्हटले जात होते. मात्र सातव यांच्यावर मुंबईतील लीलावती रुग्णालयामधील डॉक्टरांची टीम पुण्याला जाऊन उपचार करणार आहेत.
कोरोनामुळे राजीव सातव यांची तब्येत खालावली
फोनवरुन राहुल गांधींकडून विचारपूस
कोरोनाबाधित काँग्रेस खासदार राजीव सातव यांच्यावर उपचार करण्यासाठी लीलावती रुग्णालयामधील डॉक्टरांची टीम पुण्याला जाणार#rajivsatav #COVID19 pic.twitter.com/qBIB7sJiMh— Shailaja Shashikant Jogal (शैलजा शशिकांत जोगल) (@jogalshailaja) April 29, 2021
कोरोनाबाधीत झाल्यामुळे काँग्रेस पक्षाचे गुजरात प्रभारी आणि राज्यसभा खासदार राजीव सातव यांच्यावर पुण्याच्या जहांगीर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. पण सातव यांची प्रकृती आणखी खालावल्यामुळे त्यांच्यावर उपचार करण्यासाठी मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलची एक टीम पुण्यात येत आहे.
संपूर्ण देशात लॉकडाऊन केल्यास महागाई वाढेल; आरबीआयचा इशारा https://t.co/3SrmUw4yhe
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 28, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सातव हे राहुल गांधींचे विश्वासू आणि गांधी घराण्याचे निष्ठावान समजले जातात. मागच्या वर्षी काँग्रेसचे राज्यसभा खासदार आणि हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांचे सल्लागार अहमद पटेल यांचे कोरोनामुळे निधन झाले. यानंतर राजीव सातव यांचे गुजरातच्या राजकारणातील महत्त्व वाढले. सातव २०१४ च्या मोदी लाटेत हिंगोलीमधून लोकसभेवर निवडून आले होते. पण २०१९ मध्ये पराभूत झाल्यानंतर त्यांना राज्यसभेत पाठवण्यात आले.
राजीव सातव यांची प्रकृती खालावल्याची माहिती मिळताच राहुल गांधी यांनी फोन करुन चौकशी केली. सध्या राज्यमंत्री विश्वजीत कदम सातव यांच्यासोबत आहेत. राजीव सातव यांना मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करावे आणि तिथेच पुढील उपचार करावे अशी आधीची योजना होती. पण सातव यांची प्रकृती आणखी खालावल्यामुळे मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलची एक टीम पुण्यात बोलावण्याचा निर्णय झाला. ही टीम तपासणी करुन जहांगीर हॉस्पिटलच्या टीमच्या सोबतीने सातव यांच्यावर पुढील उपचार करेल.
राज्यातील पहिल्या महिला आयएफएस अधिकारी बार्शीच्या स्नुषा, सुवर्णा रविंद्र माने-झोळ यांची भारतीय वनसेवेत पदोन्नती https://t.co/XpyIA7P6wp
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 28, 2021