मुंबई : राज्यात १८ वर्षांवरील सर्वांना कोरोना लस मोफत देण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामुळे आता १ मे पासून सुरु होणाऱ्या लसीकरणात राज्यातील एकूण ५ कोटी ७१ लाख लोकांना मोफत लस मिळणार आहे. यामुळे राज्य सरकारवर ६ हजार ५०० कोटी रुपयांचा भार पडणार आहे. दरम्यान याआधी अनेक राज्यांनी मोफत लसीकरणाचा निर्णय घेतला आहे.
आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत १८ ते ४४ या वयोगटातील सर्व नागरिकांना मोफत लस देण्याचा निर्णय घेण्यात आला. #उद्धवठाकरे #BreakTheChain #Coronavirus #FREE #vaccine #maharashtra #फ्री #कोरोना #CMOMaharashtra #UdhavThackeray #surajyadigital pic.twitter.com/rmsYTzGYu7
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 28, 2021
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. महाराष्ट्रात १८ वर्षांवरील सर्वांना मोफत लसीकरण करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला आहे. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषणा केली. पाच कोटी ७१ लाख जनतेला मोफत लस मिळणार आहे. येत्या १ मेपासून देशभरात १८ वर्षांवरील नागरिकांसाठी कोरोना लसीकरण मोहीम सुरू होणार आहे.
'ओ' रक्तगटास कोरोनाचा धोका कमी, हे केवळ निरीक्षण; शास्त्रीय पुरावा नाही https://t.co/56nC0D46VJ
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 28, 2021
लसीकरण करण्यासाठी महाराष्ट्राला १२ कोटी लसींची आवश्यकता भासणार आहे. त्यासाठी राज्य सरकार ६ हजार ५०० कोटी रुपये खर्च करणार आहे. सध्या ४५ वर्ष वयोगटातील नागरिक आणि फ्रंटलाईन वर्कर्स यांना लसीकरण केले जात आहे. मात्र, राज्याच्या अनेक भागात लसींचा तुटवडा भासत असल्यामुळे सरकारला मुबलक लसी व कर्मचारी वर्ग यांची सोय करावी लागणार आहे.
महाराष्ट्रात कालपर्यंत १ कोटी ५३ लाख ३७ हजार ८३२ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. दि.२७ एप्रिल २०२१ रोजी ३,७१८ लसीकरण सत्रांच्या माध्यमातून ३,८८, २४७ लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले.#MahaVaccination pic.twitter.com/PBlLg1epFa
— Rajesh Tope (@rajeshtope11) April 28, 2021
दरम्यान, लसीकरणाबाबत आरोग्य विभाग नियोजन करत आहेत. नागरिकांना याबाबत व्यवस्थित पूर्वसूचना देण्यात येईल, त्यामुळे लसीकरण केंद्रांवर अनावश्यक गर्दी करू नये, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. ४५ वर्षांवरील वयोगटातील दीड कोटीपेक्षा जास्त जणांचे लसीकरण केले आहे. हा देशात विक्रम आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
उपमुख्यमंत्री अजित पवार , महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आरोग्यमंत्री राजेश टोपे तसेच इतर सर्व प्रमुख सहकाऱ्यांशी यासंदर्भात चर्चा झाली. सध्या राज्यसमोर आर्थिक अडचण आहे. नागरिकांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य आहे. त्यामुळेच १८ ते ४४ च्या वयोगटातील सर्वांना मोफत लस देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. लसींचा पुरवठा कसा होतो, यानुसार लसीकरण नियोजन करून पुढील कार्यक्रम जाहीर करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
काँग्रेसचे दिग्गज नेते एकनाथ गायकवाड यांचे निधन, मंत्री वर्षा गायकवाडांना पितृशोकhttps://t.co/Q5o4IVQVXL
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 28, 2021
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, त्यामुळे आरोग्य सुविधांवर होणारा खर्च, लॉकडाऊनमुळे झालेलं नुकसान यामुळे राज्याच्या तिजोरीवर खूप मोठा बोजा पडेल, असा एक मतप्रवाह सरकारमध्ये होता. गरिबांना मोफत लस दिली जावी. ज्यांना परवडेल, त्यांनी त्यासाठी पैसे मोजावेत, असं काही मंत्र्यांचं मत होतं. तर अनेक राज्यांनी मोफत लसीकरणाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आपण लसीचे पैसे आकारून लोकांची नाराजी ओढवून घेऊ नये, असं मत अनेक मंत्र्यांनी व्यक्त केलं. अखेर मोफत लसीकरणाचा निर्णय घेण्यात आला.
राज्य सरकारने आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत १८ ते ४४ या वयोगटातील सर्व नागरिकांना मोफत लस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.या वयोगटातील एकूण ५ कोटी ७१ लाख लोकांना मोफत लस देण्यात येणार आहे.राज्याला १२ कोटी लशींचा पुरवठा होणे गरजेचे आहे.#MahaVaccination
— Rajesh Tope (@rajeshtope11) April 28, 2021
* १ मेपासून महाराष्ट्रात कोरोना लसीकरण सुरू होणार नाही
देशात १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांना कोरोना लस दिली जाणार आहे. मात्र महाराष्ट्रात १ मे पासून कोरोना लस देणे शक्य होणार नाही, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे. कारण सध्या १८ ते ४४ या वयोगटातील लोकांसाठी लशींचे डोस १ मेपर्यंत उपलब्ध होणार नाहीत, असे ते म्हणाले. मात्र मे महिन्याच्या शेवटी लसीकरण सुरू होण्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.