त्रिपूरा : लग्न समारंभात कोरोना नियमांचा दाखला देऊन गुंडगिरी केल्याप्रकरणी त्रिपुरा मधील जिल्हाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. आगरतळ्याचे जिल्हाधिकारी शैलेश यादव यांना निलंबित करण्यात आले आहे. लग्न समारंभात वऱ्हाडींशी गैरवर्तन केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यानंतर मुख्यमंत्री विप्लव देव यांच्या हस्तक्षेपाने यादवांवर कारवाई करण्यात आली. दरम्यान, यादव यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.
सोलापुरात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक, 57 हजार 825 जणांनी केली कोरोनावर मात https://t.co/CremVpY5B5
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 29, 2021
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात हाहाकार घातला आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच राज्यात धार्मिक कार्यक्रम, लग्न सभारंभ, मिरवणूक यावर बंधने घालण्यात आले आहेत. काही राज्यात लग्न समारंभांना परवानगी देण्यात आली असून मर्यादित लोकांच्या उपस्थित आणि कोरोना नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. परंतु काही लग्नसमारंभांमध्ये कोरोना नियमांचे पालन होत नसल्याने कारवाई करण्यात येत आहे. असेच एक लग्न कार्य रात्रीचे सुरु असताना जिल्हाधिकाऱ्यांनी मोठ्या फौज फाट्यासह लग्न होत असलेल्या हॉलवर धाड टाकली.
राजीव सातव यांची प्रकृती गंभीर; डॉक्टरांची टीम पुण्याला जाऊन उपचार करणार, राहुल गांधींचा पुण्यातील डॉक्टरांना फोन #RajivSatavhttps://t.co/A48Ys9T4vi
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 29, 2021
यावेळी रात्रीच्या संचारबंदी चे उल्लंघन आणि कोरोना नियमांचे उल्लंघनामुळे लग्न समारंभासाठी आलेल्या वऱ्हाडींना आणि वधु-वर आणि जेवत असलेल्या लोकांना जिल्हाधिकाऱ्यांनी अपमानित करुन हाकलून लावले होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पश्चिम त्रिपुराचे जिल्हाधिकारी शैलेश कुमार यादव यांनी एका लग्न कार्यालयावर धाड टाकून वधु-वर आणि वऱ्हाडींना अपमानित करुन हाकलून लावले होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसोबत असलेल्या पोलिसांनी वऱ्हाडींना लाठीमार केला असल्याचेही समजते आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी लग्न कार्यालयावर धाड टाकून अपशब्द वापरत वधु-वरांच्या घरच्यांशी वाद घातला असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
मोदींचा मोठा निर्णय; ऑक्सिजनची चिंता मिटणार, ५०० पीएसए प्लँटमुळे ऑक्सिजन पुरवठ्यात वाढ होणार
https://t.co/gXZZni3Tcy— Surajya Digital (@SurajyaDigital) April 29, 2021
जिल्हाधिकारी संतापुन वऱ्हाडी मंडळींना बाहेर काढले असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्रिपुरातील ५ आमदारांनी जिल्हाधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी केलेलेल्य कृत्याविरोधात टीका आणि कारवाईची मागणी जोर धरु लागल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निलंबित केले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांवर मुख्यमंत्र्यांनी निलंबनाची कारवाई केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी घडल्या प्रकराबाबत माफी मागितली आहे. तसेच याबाबत राज्याच्या मुख्य सचिवांकडे घडल्या प्रकाराचा अहवाल मुख्यमंत्र्यांनी मागितली आहे.
* जिल्हाधिकाऱ्यांच्या व्हायरल व्हिडिओत पहा काय घडले
त्रिपुराचे जिल्हाधिकारी शैलेश कुमार यादव यांनी लग्न कार्यावर केलेल्या कारवाईचा व्हिडिओ सोशल मीडियावर दोन दिवसांपासून व्हायरल होत आहे. या व्हिडिओत असे दिसते आहे की, लग्नसमारंभ सुरु असताना रात्रीच्या वेळी जिल्हाधिकारी आणि पोलीसांची फौज लग्नमंडपात येतात. यावेळी वधु-वर व त्यांच्या कुटूंबीयांशी हुज्जत घालत आहेत. नातेवाईकांनी लग्नासाठी काढण्यात आलेल्या परवानगीचे कागद पत्र जिल्हाधिकांऱ्यांना दिले.
Tripura West District Magistrate (DM) Dr Shailesh Kumar Yadav ordered closure of 2marriage halls for violating night curfew order in Agartala.
Tough times calls for tough measures..wish to see the same kind of action on other religious gatherings also.#COVID19India pic.twitter.com/wm6TCkJQdO
— Viक़as (@VlKAS_PR0NAM0) April 27, 2021
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी ते कागद फाडून नातेवाईकांच्या अंगावर फेकले. व वधु वर त्यांच्या नातेवाईकांना अपमानित करुन बाहेर काढले यावेळी काही जणांना लाठीमार करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी संतापून कारवाई करत होते. तसेच जेवण्यास बसलेल्या मंडळींना अर्ध्यातूनच उठवून बाहेर काढण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या कारवाईमध्ये बाधा आणल्यामुळे एकुण ३० जणांना ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले.