सोलापूर / पंढरपूर : वडिलांनी पेपर विकून आपल्या मुलाला इंजिनीअर केलं. मुलानंही प्रामाणिकपणे अभ्यास केला आणि आपली चमक दाखवली. त्याला मोठ्या कंपनीत नोकरीही मिळाली. कुटुंब आनंदात होतं आणि यातच मुलाला कोरोनाची लागण झाली. उपचार केले मात्र, कोरोनारुपी काळाने त्याला हिरावून नेलं. आयुष्यभर केलेले कष्ट, पाहिलेली स्वप्नं क्षणात हातून निसटून गेली. ही घटना पंढरपुरात घडली आहे. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मोफत लसीकरणावरुन ठाकरे सरकार पडले तोंडघशी – भाजप https://t.co/e25xJWigQY
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 29, 2021
दररोज पहाटे दारोदार फिरुन पेपर टाकण्याचे काम करत एक तरुण इंजिनियर झाला. त्यासाठी वडीलही खूप कष्ट करत होते. या तरुणाने शिक्षणात आपली चमक दाखवली आणि त्याला बड्या कंपनीत नोकरीही मिळाली. नोकरीसोबतच लग्नही जमलं. कुटुंब आनंदात असतानाच तरुणाला कोरोना झाला. उपचार केले, मात्र कोरोनारुपी काळाने त्याला हिरावून नेले. क्षणार्धात आयुष्यभर केलेले कष्ट, पाहिलेली स्वप्नं, हातून निसटून गेली.
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना कोरोनाची लागण https://t.co/qawUNOhGal
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 29, 2021
इंजिनियर शुभम भोसले हा पहिल्यापासून अतिशय हुशार म्हणून शाळेत नावाजला जायचा. घरची गरिबी असल्याने लहानपणापासून वडिलांना घरोघरी पेपर टाकण्यात मदत करायचा. वडील सोमनाथ भोसले हे पंढरपुरातील पेपर विक्रेते होते. त्यामुळे पहाटे चार वाजल्यापासून शुभमचा दिवस सुरु व्हायचा. वडिलांना मदत करत तो शिक्षण घेत होता. बारावीला चांगले मार्क मिळाल्याने त्याला कुठेही प्रवेश मिळू शकत असता. पण घरच्या परिस्थितीची जाणीव ठेवत पंढरपूर येथील स्वेरी इंजिनियरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेत त्याने कॉम्प्युटर इंजिनियरिंगची पदवी चांगल्या गुणांनी मिळवली.
माझ्या घरचे लोक मरत आहेत, प्लीज मदत करा – प्रियांका चोप्रा https://t.co/shqM9MCZAl
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 29, 2021
उत्तम गुणांच्या जोरावर त्याला कोलकाता येथे टीसीएस या मोठ्या कंपनीत चांगल्या पगाराची नोकरीही मिळाली. आता भोसले कुटुंबाचे चांगले दिवस येण्याची वेळ आली होती. कोरोनाच्या संकटामध्ये शुभम घरुनच कंपनीचे काम अखंड करत होता. काही दिवसांपूर्वी त्याचा विवाह निश्चित होऊन साखरपुडाही झाला. आता सगळे चांगले घडणार या स्वप्नात सोमनाथ भोसले आणि त्याचे कुटुंब असतानाच चार पाच दिवसापूर्वी शुभमला कोरोनाची लक्षणे जाणवू लागली.
पंकजाताई, मोठा भाऊ म्हणून मी सोबत; धनंजय मुंडेंची फेसबुक पोस्ट https://t.co/ICIbGJO2s4
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 29, 2021
पहिल्यांदा पंढरपूर येथेच त्याने उपचार घेतले. मात्र त्रास वाढू लागल्याने त्याला सोलापुरातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलवले. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र कोरोनारुपी काळाने आज पहाटे त्याला सगळ्यातून हिरावून नेले. आपल्या भावी आयुष्याची स्वप्ने रंगवणारा अवघ्या 24 वर्षांचा शुभम अर्ध्यावरच वाट सोडून निघून गेला. ज्या मुलाच्या भविष्यासाठी वडील सोमनाथ भोसले यांनी जीवापाड कष्ट केले, त्यांना चांगले दिवस दिसू लागताच काळाने हा घाला घातला. शुभमच्या मृत्यूने भोसले कुटुंबावर आभाळच कोसळले आहे.
* चांगले दिवस येताच कोरोनाने मृत्यू
भोसले कुटुंबाचे चांगले दिवस येण्याची वेळ आली होती. कोरोनाच्या संकटामध्ये शुभम घरातूनच कंपनीचं काम करत होता. काही दिवसांपूर्वी त्याचा विवाह निश्चित होऊन साखरपुडाही झाला. आता सगळं चांगलं होणार या स्वप्नात सोमनाथ भोसले आणि त्याचे कुटुंब असतानाच, चार-पाच दिवसांपूर्वी शुभमला कोरोनाची लक्षणं जाणवू लागली. पहिल्यांदा पंढरपूरात उपचार केले, त्रास वाढू लागल्यानं त्याला सोलापुरातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलवलं. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले मात्र काल सकाळी त्याची प्राणज्योत मालवली.
गिरीशभाऊंना राजकारणात जन्माला मी आणले, प्रचारासाठी गल्लोगल्ली मी फिरलो म्हणून आज गिरीश भाऊ दिसतायत – एकनाथ खडसे #political #EknathKhadse #surajyadigital #Girish #mahajan #सुराज्यडिजिटल #एकनाथखडसे #राजकारणhttps://t.co/fCkwFpe58z
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 29, 2021